Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना दिलासा; रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे या महिन्यापर्यंत असणार निशुल्क

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : माझी लाडकी बहीण'योजनेसाठी महिलांना रेशनकार्ड मधील नावे कमी करणे व नावे समाविष्ट करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत निशुल्क करण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी रेशनकार्ड तातडीने द्यावे. तसेच रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला दिल्या आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील मुली, महिला यांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे.योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेसाठी रेशनकार्डसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महिलांना रेशनकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे. अर्जदार महिलेने रेशनकार्डसाठी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.

त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांनी संनियंत्रण ठेवावे. तसेच रेशन कार्ड सह आवश्यक कागदपत्रे देण्यास दिरंगाई किंवा पैशाची मागणी होत असेल तर संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. आवश्यक कागदपत्रांसाठी महिला भगिनींना रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देशही मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांना रेशनकार्ड मध्ये नाव असणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी पुरवठा विभागाकडे माहेरच्या रेशन कार्ड मधून नाव कमी करणे व सासरच्या रेशनकार्ड मध्ये नाव लावण्यासाठी अधिक गर्दी होत आहे. याबाबत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महिलांचे नाव कमी करणे व लावणे यासाठी लागणाऱ्या दाखल्याला आवश्यक असलेली शासकीय ३३ रुपये फी दि.३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना महिलांचे अर्ज पुरवठा विभागाने तातडीने स्वीकारून ते मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT