MSRTC ST Bus Attack Saam tv
महाराष्ट्र

MSRTC ST Bus Attack: बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली, ठाकरे गट आक्रमक

MSRTC ST Bus Attack: कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र महामंडळाची एसटी अडवून बस चालकाला कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. या निषेधार्थ आता शिवसेना आक्रमक झालेली आहे.

Bharat Jadhav

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी बसला काळं फासण्याची घटना घडली. बस चालकालाही काळ फासत त्याला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे सेना देखील आक्रमक झाली असून राज्यातून कर्नाटकमध्ये होणार एसटी बस वाहतूक थांबवण्यात आलीय. कोणतीच एसटी बस आता कर्नाटकडे जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे - बेंगळुरू महामार्गावरील चित्रदुर्ग इथे महाराष्ट्र राज्याच्या एसटीला अडवून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालकास मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली. एसटी चालकाला कन्नड येतं का ? असं विचारत मारहाण केली गेली. त्यानंतर त्याच्या चेहऱ्याला काळ देखील फासण्यात आलं. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.

चित्रदुर्ग येथे घडलेल्या या घटनेचे पडसाद आज कोल्हापुरात उमटत आहेत. कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टँड परिसरात शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने केली जात आहे. कोल्हापुरात येणाऱ्या कर्नाटक राज्याच्या एसटी बसेस शिवसेनेच्या वतीने अडवण्यात येत आहेत. कर्नाटकातील चित्रदुर्ग या परिसरात काल महाराष्ट्राची एसटी अडवून एसटी चालकाला कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे.

या निषेधार्थ आता शिवसेना आक्रमक झालेली आहे. कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टॅन्ड परिसरात कर्नाटक राज्यातल्या एसटी बसेस अडवण्यात आलेले आहेत. यादरम्यान महामंडळाने महाराष्ट्रतून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालकाला मारहाण प्रकरणानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने कोल्हापूर सेंट्रल बस स्टँड परिसरात निदर्शने केली जात आहेत.

शिवसेनेच्यावतीने कर्नाटक एसटीवर भगवे झेंडे लावण्यात येत असून कर्नाटक सरकारचा निषेध केला जात आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्याच्या कार्यकर्त्यांचा निषेध ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान निदर्शने करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT