MSRTC  you tube
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi Yatra: एसटी महामंडळामुळे विठुरायाच्या होणार दर्शन ; कार्तिकी यात्रेसाठी २ हजार ७०० बसेसचे नियोजन

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक प्रवासी येथील पंढरपूर येथे जात असतात. हे भाविक एकादशीनंतर परतीचा प्रवास सुरू करतात. त्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी संपूर्ण बसचे ऍडव्हान्स बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

MSRTC Buses For Kartiki Ekadashi Yatra:

कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त हजारो विठुरायाचे भाविक पंढरपुरात येत आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाने तब्बल २ हजार ७०० यात्रा स्पेशल बसेस सोडण्याचं नियोजन केलंय. पंढरीतील भव्य अशा नवीन चंद्रभागा बस स्थानकातून २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्यभरातून बस वाहतूक होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या जादा बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस टी महामंडळाकडून करण्यात आले आहे. (Latest News)

कार्तिकी यात्रेला विदर्भ, मराठवाडा येथील भाविकांपेक्षा कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या जिल्ह्यातील भाविकांची पंढरपुरात जास्त गर्दी होते. दरवर्षी कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या कोकणासह उर्वरित महाराष्ट्रातील भाविक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने यात्रा स्पेशल जादा बसेस सोडल्या जातात.

यंदादेखील एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेस सोडल्या आहेत. दरम्यान मागील आषाढी यात्रेपूर्वी स्पेशल बसेसची वाहतूक नवीन बस स्थानकातून होत होती. मात्र आषाढी यात्रेपासून नव्याने बांधण्यात आलेल्या चंद्रभागा बस स्थानकातून यात्रेचा अतिरिक्त बसेसची वाहतूक होईल. कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक प्रवासी येथील पंढरपूर येथे जात असतात. हे भाविक एकादशीनंतर परतीचा प्रवास सुरू करतात. त्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी संपूर्ण बसचे ऍडव्हान्स बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाविकांसाठी सुविधा

या बसस्थानकामध्ये तब्बल ३६ फलाट आहेत. कार्तिकी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी या बस स्थानकामध्ये सतरा विभाग पाडण्यात आले आहेत. तसेच चंद्रभागा बस स्थानकामध्ये महामंडळाने भाविकांसाठी थंड पाणी, स्वच्छतागृहे, उपहार, आपला दवाखाना, ॲम्बुलन्स आधीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात. याशिवाय ५० पर्यवेक्षक कर्मचारी, सोलापूरसह इतर विभागातील अधिकारी, मार्ग तपासणी पथक व एसटी बिघाड दुरुस्ती वाहन सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पंढरपूर बस आगारचे प्रमुख मोहन वाकळे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT