st bus news saam tv
महाराष्ट्र

MSRTC : एसटीचा सवलतीचा प्रवास बदलला; महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागणार, सरकारचा प्लान काय?

MSRTC smart card registration : एसटी बसने सवलतीत प्रवास करणाऱ्यांसाठी आता NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मंत्री सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली.. हे कार्ड नेमकं कसं काम करणार? त्याची किंमत किती असेल? जाणून घ्या

Namdeo Kumbhar

MSRTC NCMC News : एसटी बसने सवलतीत प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची अन् कामाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी अथवा इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत सवलतीत एसटी प्रवास करत असाल तर तुम्हाला यापुढे स्मार्ट कार्ड घ्यावे लागेल. कारण, राज्य सरकारकडून सवलतीत प्रवास करणार्‍यांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) आणले आहे. सवलतीत प्रवास करताना यापुढे फक्त ओळखपत्र दाखवून चालणार नाही, तर तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड असायलाच हवं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या स्मार्टकार्डबाबत घोषणा केलेली आहे.

सवलतीत एसटी बसने प्रवास करत असाल तर यापुढे NCMC कार्ड खिशात ठेवावच लागेल. फक्त आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र दाखवून सवलतीत प्रवास करण्याचे दिवस संपले आहेत. प्रवासात करताना तुमच्याकडे NCMC कार्ड नसेल तर तुम्हाला सवलत नाकारली जाऊ शकते आणि पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागेल. पण हा नवा नियम नेमका काय आहे? NCMC कार्डसाठी किती शुल्क आकारले जाणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत...

सरनाईक म्हणाले की, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार असल्याची माहिती मिळतेय.

कोणाला मिळणार NCMC कार्ड?

विद्यार्थी : शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.

ज्येष्ठ नागरिक व महिला : अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.

दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.

पुरस्कारार्थी व पत्रकार: स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारा मार्फत वितरण.

NCMC कार्डची नेमकी किंमत किती असेल?

नवीन NCMC कार्डची किंमत १९९ रुपये (GST सह) इतकी आहे. जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत हे कार्ड मिळेल. एनसीएमसी कार्डमध्ये कमीत कमी १०० रूपये ठेवणं अनिवार्य असेल. त्याशिवाय ५० पटीत या कार्डवर रिचार्ज करता येईल. ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून या कार्डवर रिचार्ज करता येणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बसस्थानकांवरच NCMC नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT