MSRTC Jobs Saam Tv
महाराष्ट्र

MSRTC Jobs: तयारीला लागा! एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती, प्रताप सरनाईकांनी केली घोषणा

MSRTC ST Mahamandal Bharti 2026: एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात १७ हजार ७४२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. लवकर यासाठी प्रक्रिया सुरु होईल.

Siddhi Hande

एसटी महामंडळात नोकरीची संधी

१७ हजार ७४२ पदांसाठी भरती जाहीर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

महाराष्ट्र शासनात सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगाभरती होणार आहे. एसटी महामंडळात १७ हजार ७४२ पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी माहिती दिली आहे.

एसटी महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन बस खरेदी करणार आहे. या नवीन बस सेवेसाठी मनुष्यबळ लागणार आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महामंडळामध्ये बस वाढणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची संख्यादेखील वाढवावी लागणार आहे. यासाठी १७ हजार ७४२ पदांची भरती जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

कुणाला संधी मिळणार? (ST Mahamandal Bharti Eligibility)

परिवहन विभागाची ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. यामध्ये २०२२ मध्ये झालेल्या संपादरम्यान एसटी सुरु ठेवण्यासाठी ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केले त्यांना या भरतीत प्रधान्य दिले जाणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतदेखील सामावून घेतले जाऊ शकते.

महामंडळाच्या एसटी बसमध्ये वाढ होत आहे. सध्या एसटी महामंडळाकडे १४,००० बस आहेत. त्यात ५००० बस वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे वाढत्या बसेससाठी चालक, वाहन, फिटर अशा अनेक तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यासाठी भरती करण्याचे संकेत सरकारने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT