MSRTC issues strict warning to vendors against overcharging for NCMC smart cards across Maharashtra Saam tv
महाराष्ट्र

MSRTC: एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केली तर परवाना रद्द होणार परिवहन मंत्र्यांचा इशारा

Transport Minister Issues Warning Over NCMC Card: एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी जास्त शुल्क आकारणाऱ्या विक्रेत्यांना एमएसआरटीसीने इशारा दिलाय. नियमांचे उल्लंघन केल्यास परवाने रद्द केले जातील, असे परिवहन मंत्री म्हणालेत.

Bharat Jadhav

  • एसटीकडून NCMC स्मार्ट कार्डचे राज्यभर वितरण सुरू

  • कार्डचे दर निश्चित: नवीनसाठी ₹१९९, जुन्यांसाठी ₹१४९

  • जादा दर आकारणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. पण काही अधिकृत विक्रेत्यांनी सवलतधारक प्रवाशांना जास्त दराने कार्डची विक्री केली अशा तक्रारी प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू आहे.

महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. या गोष्टीमुळे प्रवास अधिक सुलभ होईल. यासह सवलतींचा लाभ डिजिटल पद्धतीने देणे शक्य होईल. NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती निश्चित केली गेली आहे.

सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धाड धाड...! गावठी कट्ट्याने शेतात काम करणार्‍यावर गोळीबार; पोलीस तातडीने घटनास्थळी

Maharashtra News Live Update: सोलापुरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक

Vikas Lavande: विकास लवांडे यांना जामीन मंजूर, पण कोर्टाने घातल्या अटी शर्ती; नेमकं काय म्हणाले?

Politics : प्रस्थापित राजकीय पक्षाला जोरदार झटका; ४ आमदारांचे तडकाफडकी राजीनामे, तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ

Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयातून थरार! पत्नी आणि वडिलांवर झाडल्या गोळ्या; संतापाच्या भरात मुलाकडून दुहेरी हत्या

SCROLL FOR NEXT