Chandrapur Girl MPSC Success Story
Chandrapur Girl MPSC Success Story Saam TV
महाराष्ट्र

MPSC Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी ZP शाळेत शिकली अन् अधिकारी झाली, MPSC परीक्षेत राज्यात पहिली

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur Girl MPSC Success Story: महाराष्ट्रातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक MPSC परीक्षेत यश मिळावं म्हणून दरवर्षी लाखो उमेदवार जीवतोड मेहनत करुन परीक्षा देत असतात. मात्र, खूप कमी जण या परीक्षेत पास होत असतात. जिद्द आणि चिकाटी असली की नशीब झुकतं असं नेहमीच म्हणतात. याचाच प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमुर तालुक्यातून आला आहे. (Breaking Marathi News)

चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. शालू शामराव घरत असं या मुलीचं नाव आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना देखील शालूने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट क परीक्षेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. (Latest Marathi News)

अगदी बोटावर मोजण्याइतकी लोकसंख्या असलेल्या पांढरवानी गावातील (Chandrapur) शालू अधिकारी झाल्याने गावकऱ्यांनी ढोल, ताशाच्या गजरात जंगी मिरवणूक काढत शालूवर फुलांचा वर्षाव केला. महिलांनी औक्षण सुद्धा केले. गावाने केलेले भव्यदिव्य स्वागत बघून शालू भावनिक झाली होती.

आता शालूची नियुक्ती उद्योग निरीक्षक म्हणून होणार आहे. शालूचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले असून पुढील शिक्षण नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयातून पूर्ण केले. सध्या तिचे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण सुरु आहे. दरम्यान तिने स्पर्धा परीक्षा वर्गामध्ये प्रवेश घेतला.

ब्राईटएज फाऊन्डेशनच्या मॅजिक परिवारामार्फत देण्यात येणाऱ्या सहारा शिष्यवृत्तीकरीता शालुची निवड करण्यात आली. या शिष्यवृत्तीमधून दरमहा आर्थिक मदत तिला मिळत होती. यामुळे तिला पुणेसारख्या शहरात विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणासह स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली. अभ्यासात सातत्य आणि नियोजन असले तर यश नक्की मिळते, असे शालू घरतने म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT