MPSC IAS 
महाराष्ट्र

MPSCतील 9 घोटाळेबाज कोण? 9 दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

MPSC IAS : प्रशिक्षणार्थी आएएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद सुरू झाल्यानंतर आता एमपीएससीत सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांचीही चौकशी सुरू झालीय. एमपीएससीतील 9 दिव्यांग अधिका-यांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी सुरु झाली आहे. पाहूया साम टीव्हीचा एक विशेष रिपोर्ट.

Girish Nikam

प्रशिक्षणार्थी आएएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरील वादानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने 2022 साली उत्तीर्ण झालेल्या 9 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी सुरु केली आहे. ज्या भागातून दिव्यांग प्रमाणपत्र काढलंय. तेथील आरोग्य उपसंचालकांसमोर या प्रमाणपत्रांची फेरतपासणी होणार आहे. फेरतपासणीसाठी उपस्थित न राहिल्यास निवड रद्द होणार आहे. याप्रकरणी पाठपुरावा करणारे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवलंय.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयानं पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं. त्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांवर आक्षेप घेण्यात आलाय. दरम्यान एमपीएससीच नाही तर शासनाच्या सरळ सेवा भरतीतही काही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप होतोय. एमपीएससीत अशा बोगस प्रमाणपत्राद्वारे 250 उमेदवारांनी नोकरी बळकावल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय.

चौकशीच्या फे-य़ात असलेल्या अधिका-यांनी कुठून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं ते पाहूया.

कुठून मिळवली दिव्यांग प्रमाणपत्रं ?

मेडिकल अथॉरिटी कॉलेज, कोल्हापूर

आर.सी.एस.एम गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, कोल्हापूर

मेडिकल अथॉरिटी, नाशिक

मेडिकल अथॉरिटी, पुणे

मेडिकल अथॉरिटी, यवतमाळ

डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल, लातूर

मेडिकल अथॉरिटी, ठाणे

आधीच सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट अधिका-यांच्या कारभारानं सामान्य जनता त्रस्त आहे. बोगस प्रमाणपत्राद्वांरे शासनाची नोकरी मिळवलेल्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी करणार ? असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT