Vinayak Raut Protest Saam Tv
महाराष्ट्र

Barsu Refinery Latest Update: बारसू आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार विनायक राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest News: बारसू प्रकल्पाविरोधातील ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे.

Priya More

Ratnagiri News: बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Project) स्थानिकांचा विरोध कायम आहे. या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलक ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आलेल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बारसू प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरु आहे. काहीही झाले तरी हा प्रकल्प होऊन देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. खासदार विनायक राऊत आज शिवसेना कार्यकर्त्यांसोबत बारसू प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी सुरुवातीला पोलिसांनी (Ratnagiri Police) विनायक राऊत यांचा ताफा अडवला. त्यानंतर विनायक राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले.

त्यानंतर पोलिसांनी विनायक राऊत यांच्याशी चर्चा करुन त्यांची एकच गाडी बारसू ग्रामस्थांचे आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी पाठवली. पण आंदोलन ठिकाणी पोहचलेल्या विनायक राऊतांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे सध्या आंदोलन ठिकाणी तणावपूर्ण स्थिती आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज पाचव्या दिवशी देखील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बारसू परिसरातील माळावर शेकडो महिला आंदोलक एकत्र आल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन मागं घेतले जाणार नाही. जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा इशारा या महिला आंदोलकांनी दिलेला आहे. या महिला आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

या प्रकल्पाविरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी हा प्रकल्प आम्हाला नकोच असे सांगितले आहे. आमच्या आंदोलनामध्ये जर कोणी आडवं आलं तर आम्ही त्यांना जशात तसं उत्तर देऊ असा इशारा देखील यावेळी या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. बारसू परिसरातील ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची गुरुवारी राजापूरात बैठक झाली. या बैठकीमध्ये देखील या ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध असल्याची आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले होते. आता हे ग्रामस्थ आज पुन्हा आंदोलन ठिकाणी मोठ्यासंख्येने उपस्थित राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra News Live Update: बारामतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नागरिकांची धावपळ

OTT Weekend List: वीकेंडला पार्टनरसोबत घरी निवांत वेळ घालवायचा आहे का? मग पाहा या 7 रोमँटिक वेब सीरिज

TCS धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा! पीडित तरुणीला दाखवले व्हिडिओ, मौलाना कनेक्शन उघड

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, OBC प्रमाणे ८ योजनांचा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT