Sanjay Raut On BJP: 'भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालंय...', संजय राऊतांचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Latest News: बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (Barsu Refinery Project) देखील त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautPolitical News
Published On

Delhi News: ठाकरे गटाचे नेते (Thackeray Group) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 'भाजपला शिंदे सरकारचं (Shinde Government) ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ घेऊन फिरायचं असं त्यांना वाटतं आहे. याबाबतच्या चर्चा मी देखील ऐकून आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य करत पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (Barsu Refinery Project) देखील त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Sanjay Raut
Palghar News : ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला; पंचायत समिती उपसभापतींवर हल्ला, झेडपी सदस्यांवर गुन्हा दाखल

बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सुरु असलेल्या आंदोलनानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान शरद पवारांनी उदय सामंताना 'स्थानिक लोकांशी चर्चा करा. त्यांना विश्वासात घ्या.' असा सल्ला दिला होता. यारुन देखील संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, 'विश्वासात घ्या म्हणजे काय करायचं? स्थानिकांचा या सरकारवर विश्वासच नाही.' असा टोला त्यांनी लगावला आहे.

Sanjay Raut
Pandharpur Accident News: वादळी वाऱ्याने झोळी हवेत उडाली; २ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत, मन सुन्न करणारी घटना

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'सत्ताधारी उद्धव ठाकरे यांचे पत्र दाखवत होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावर स्पष्टपणे सांगितले आहे. केंद्राकडून वारंवार पर्यायी जागेची मागणी होत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पर्यायी जागा सूचवली होती. पण अडीच वर्षे सत्तेत असताना ही जागा मिळावी म्हणून जोर जबरदस्ती केली नाही.' तसंच, 'लोकांना नको असेल तर बारसूही नको ही आमची भूमिका होती.', असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.

Sanjay Raut
Pune Rain Updates: पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात; हडपसर, मांजरी परिसरात बरसल्या पावसाच्या सरी

'बारसूतील स्थानिक लोकं रस्त्यावर उतरले आहेत. मोर्चा निघत आहे. उद्धव ठाकरेही तिकडे जाणार आहेत. वातावरण चिघळत ठेवण्यापेक्षा भूसंपादन आणि सर्व्हेक्षण मागे घेतलं पाहिजे. तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही.' असे त्यांनी सांगितले. तसंच, 'भूसंपादन रद्द केलं नाही तर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. तसंच यावेळी त्यांनी बारसूत परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांची यादी जाहीर करावी. अन्यथा स्थानिक खासदार विनायक राऊत हे यादी जाहीर करतील, असा देखील इशारा राज्य सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com