Nitesh Rane News : बारसूत काेणाच्या जमिनी करा जाहीर, मग तुमचे मालकच अडचणीत येतील; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा (पाहा व्हिडिओ)

बारसू प्रकल्पावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे.
Nitesh Rane, Sanjay Raut, barsu refinery project, barsu refinery
Nitesh Rane, Sanjay Raut, barsu refinery project, barsu refinerysaam tv

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : बारसूत (barsu refinery) ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत त्यांच्या याद्या नक्की जाहीर करा, मग आम्ही देखील काही याद्या जाहीर करताे असा इशारा भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना दिला आहे. खासदार राऊत यांनी बारसूत परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांची यादी जाहीर करावी. अन्यथा स्थानिक खासदार विनायक राऊत हे यादी जाहीर करतील, असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर नितेश राणेंनी खासदार राऊत यांना आव्हान दिले आहे. (Maharashtra News)

Nitesh Rane, Sanjay Raut, barsu refinery project, barsu refinery
Shirdi Breaking News: १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक; वाचा ग्रामस्थांच्या मागण्या (पाहा व्हिडीओ)

आज खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर देताना भाेंग्याचा डेसिबल कमी झाल्याचे जाणवल्याची खाेचक टीका केली. राणे म्हणाले माजी खासदार निलेश राणेंनी (nilesh rane) काेणाच्या जमिनी बारसूत आहेत हे नावासह जाहीर केली हाेती. यामध्ये ठाकरेंच्या जमिनी कशा आहेत हे त्यावेळी सांगितलं हाेते. आता राऊत यांना नाव जाहीर करायची असल्यास त्यांनी करावीत. त्यांना त्यांच्या मालकांना अडचणीत आणायचे असल्यास आणावे.

Nitesh Rane, Sanjay Raut, barsu refinery project, barsu refinery
Satara APMC Election News : आम्ही लढणारी माणसं, 'स्वाभिमानी' चा कार्यकर्ता धमक्यांना भीक घालत नाही : राजू शेट्टी

आम्ही देखील बारसू आणि परिसरात उद्धव ठाकरे यांच्याशी निगडीत आणि काेणा काेणाच्या जमिनी कशा पद्धतीने आहेत हे जाहीर करु. आम्ही सात बा-यासह जाहीर करु हे लक्षात घ्या असा इशारा राणेंना राऊतांना दिला आहे.

सरकार सातत्याने सांगत आहे बारसूचा प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय केला जाणार नाही. तरी देखील तु्म्हांला जास्त उलगडा करायची इच्छा असेल, आपल्या मालकाला अडचणीत आणायचे असल्यास जरुर बाेला असे राणेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com