Narendra modi News, Supriya Sule News, jobs, amravati news. saam tv
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले स्वागत; काँग्रेसचेही मानले आभार

खासदार सुप्रिया सुळे या आज अमरावती जिल्हा दाै-यावर आल्या आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : येत्या दीड वर्षात दीड लाख शासकीय नाेक-या देण्याची घाेषणा पंतप्रधान नरेंद्र माेदी (narendra modi) यांनी नुकतीच केली आहे. देशातील नव्या पिढीस नाेकरी मिळणार असेल तर या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करते अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी अमरावती (amravati) येथे व्यक्त केली. खासदार सुळे या अमरावीत दौऱ्यावर आल्या आहेत. सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. (supriya sule latest marathi news)

अमरावती येथे आज सुप्रिया सुळे यांनी अंबादेवी व एकविरा देवीचा दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नावर सुळे म्हणाल्या मी मांदिरात कधीही मागायला येत नाही. केवळ आभार मानायला येते. ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी घेतले जात आहे या प्रश्नावर सुळे म्हणाल्या मला याबाबत काहीच माहीत नाही. मी एका संघटनेत काम करते मी एक खासदार असल्याने मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो. दरम्यान काँग्रेसच्या पक्षाध्यक्षाने देखील पवार साहेबांच्या नावास पाठींबा दिला असे सांगताच सुळेंनी मी काॅंग्रेस (congress) पक्षाचे आभार मानते असे नमूद केले.

विधान परिषद निवडणुकी नंतर सरकार कोसळेल असा दावा भाजपने केला आहे त्यावर सुळे म्हणाल्या गेल्या अडीच वर्षांपासून तारखांवर तारखा देताहेत. आणखी एक तारीख. राष्ट्रवादी (ncp) संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर नाराज नाही. कालच संजय राऊत आणि देवेंद्र भुयार भेटले. खूप छान फोटो निघालेत असेही सुळेंनी एका प्रश्नास उत्तर दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

Maharashtra Live News Update : ज्या संविधानाने देशाला एकसंघ ठेवले,पंतप्रधान मोदी म्हणतात की गीता बायबल कुराण पेक्षा संविधान हे प्रिय आहे - देवेंद्र फडणवीस

Moong Dal Sheera Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग आजचं घरी बनवा हॉटेल स्टाईल मूग डाळ शीर

Rapid Weight Gain: वजन झपाट्याने वाढत चाललंय; थांबा आताच व्हा सावध, होतील 'हे' गंभीर आजार

Nagpur Tourism : पक्षीप्रेमींसाठी नागपूरमधील बेस्ट लोकेशन, एकदा नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT