SHRIKANT SHINDE CONVOY ACCIDENT IN NANDED; FOUR VEHICLES COLLIDE DURING SHIV SAMVAD TOUR Saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या

Shrikant Shinde Convoy Accident: नांदेडमध्ये साठे चौकात अचानक ब्रेक लावल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा अपघात झाला. शिवसंवाद दौऱ्याअंतर्गत नायगावला भेट देत असताना चार वाहनांची टक्कर झाली.

Bharat Jadhav

नांदेडमध्ये घडली अपघातीची घटना

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

अपघातानंतर परिसरात खळबळ

नांदेडमधून मोठी बातमी हाती आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झालाय. नांदेडच्या साठे चौकात शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झालाय. नांदेडहून नायगावकडे जाताना ही दुर्घटना घडली. आढावा बैठकीला जाताना ही घटना घडली.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झाला. नांदेड शहरातील साठे चौक परीसरात ही घटना घडली.या तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या.सकाळी नांदेडहून खासदार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नायगावकडे निघाला.शिव संवाद दौऱ्यानिम्मित नायगाव येथे खासदार शिंदे हे पक्षाच्या आढावा बैठकी निघाले होते.शहरातून निघाल्यानंतर. साठे चौक येथे त्यांच्या ताब्यातील एका वाहनासमोर एक व्यक्ती अचानक आला. त्यामूळे चालकाने ब्रेक मारला.समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने मागच्या तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या.

खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसंवाद दौऱ्यावर आहेत. जालन्यातील दौऱ्यादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्षातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत युती होईल अथवा नाही याची चर्चा करू नका,असं शिंदेंनी म्हटलं.

'सर्व ठिकाणी जागा लढवण्याचा निर्धार करा. कमिट्यांवर नियुक्त्या नाहीत, आमच्या भागात मंत्री, आमदार, खासदार नसल्याच्या तक्रारीत अर्थ नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात तुफान हाणामारी, फेरीवाल्यांनी एकमेकांची डोकी फोडली

Drinks to lower cholesterol: नसांमध्ये जमलेलं घाण कोलेस्ट्रॉल लगेच पडेल बाहेर; हे ४ घरगुती ड्रिंक्स करा ट्राय

Maharashtra News Live Update: कसारा रेल्वे स्थानकात महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून निघाला धूर

Gold And Silver Rate: सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या दिवसाअखेरचे दर

मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT