Shivsena  Saam TV
महाराष्ट्र

Shivsena: मोठी बातमी! उद्या नव्या शिवसेना प्रमुखाची घोषणा होणार? शिंदे गटाकडून हालचाली सुरू

निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आता शिंदे गटाकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics: शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. कारण आता उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षावर कसलाही हक्क राहिला नाही.

निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आता शिंदे गटाकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

उद्या होणार महत्वाची बैठक..

याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणुक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेतील अंतर्गत निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून नव्या राष्ट्रीय कार्यकरणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी पक्ष प्रतोत भरत गोगावले यांनी उद्याच पक्षातील आमदारांची बैठक देखील बोलावली आहे.

या बैठकित नव्या राष्ट्रीय कार्यकरणीबाबतही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शिवसेना पक्ष प्रमुखपदी कोण विराजमान होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नव्या कार्यकरणीसाठी पक्षाची निवडणुक घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत पक्ष प्रमुख पदी एकनाथ शिंदे विराजमान होतात की, पक्ष नेता या नव्या पदाची निर्मिती करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाने आव्हान दिल्यास न्यायालयाने एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश देऊ नये. त्यांची बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT