Sharad Pawar: 'मी एकदाच सांगतो यापुढे...' शिंदे- ठाकरे संघर्षावर शरद पवारांचे मोठे विधान

हा सगळा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे..
Uddhav Thackeray & Sharad Pawar
Uddhav Thackeray & Sharad PawarSaam Tv
Published On

मंगेश कचरे...

Maharashtra Political Crysis: निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष (Shivsena) आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण आता उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षावर कसलाही हक्क राहिला नाही.

या निकालावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला असून, यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हा सगळा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे..

Uddhav Thackeray & Sharad Pawar
Shivjayanti 2023: शिवनेरीवर महाआरतीचा विश्वविक्रम; गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

काय म्हणाले शरद पवार...

राज्यात चाललेल्या शिंदे- ठाकरे सत्ता संघर्षावर शरद पवार यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी, "सध्या धनुष्यबाणाचा जो वाद सुरू आहे. त्यात मी पडणार नाही, हे मी एकदाच सांगतो," असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

त्याआधी हा निकाल लागल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी " एकदा निकाल दिल्यानंतर त्यावर चर्चा होत नसते. त्यामुळे नवे पक्ष नाव आणि चिन्ह घेऊन निवडणूकीला सामोरे जायचे असते. लोक फार तर १५ दिवस महिनाभर चर्चा करतात आणि त्यानंतर नवे निवडणूक चिन्ह स्विकारतात," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Uddhav Thackeray & Sharad Pawar
Maharashtra Politics: राज्यातील सत्ता संघर्षासाठी तीन दिवस महत्त्वाचे, पुढील आठवड्यात सलग सुनावणी

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाने आव्हान दिल्यास न्यायालयाने एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश देऊ नये. त्यांची बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com