अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी
Jalna Latest News Update : जालन्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घनसांवगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव गावात महिलेने पोटच्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सिद्धेश्वर पिंपळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महिलेने पोटच्या पोरांसह टोकाचा निर्णय का घेतला? याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सविता खरात (वय २५ वर्ष), मुलगा भावेश खरात (वय ५वर्ष) आणि आबा खरात (वय ३ वर्ष) अशी मयताचे नावे आहेत. सविता यांनी आपल्या दोन लेकरांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवल आहे. सविता खरात यांनी हे टोकाच पाऊल का उचलल? याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. मात्र दोन लेकरांसह महिलेने आपलं जीवन संपवल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून पाणी उपसून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे सिद्धेश्वर पिंपळगाव गावासह परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे, आत्महत्या की हत्या याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.
महत्त्वाची नोट
जालन्यात घडलेली ही घटना अत्यंत हृदयद्रावक आणि दुःखदायक आहे. अशा प्रकारच्या प्रसंगांमुळे संपूर्ण समाज हादरतो. आत्महत्येच्या मागची कारणं शोधून त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला किंवा कोणालाही मानसिक तणाव जाणवत असेल, तर कृपया त्वरित मदत घ्या. आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोला, समुपदेशक किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधा. कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकतो. तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.