nagar, chandwad, kendrai devi mata saam tv
महाराष्ट्र

Chandwad News : आईसह ७ महिन्याच्या लेकीचा धरणात बुडून मृत्यू

वडणेरभैरव पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- अजय साेनवणे

Kedrai Dam News : चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केंद्राई देवी मातेचा (kedrai devi mata) नवसपूर्ती करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले (akole) येथील वडार समाजाचे नागरिक आले होते. यावेळी २२ वर्षीय महिला व तिची 7 महिन्याची चिमुकली केंद्राई धरणातील पाण्यात बुडून मयत झाल्या. या घटनेबाबत वडणेरभैरव पोलीसात (vadner bhairav) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहू नगर येथील वडार समाजाचे नागरिक शुक्रवार रोजी चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केंद्राई माता मंदिरात नवसपूर्ती करण्यासाठी आले होते.

यावेळी ज्या सात वर्षाच्या मुलीचा नवस होता. ती ७ महिन्याची तन्वी निलेश देवकर व तिची आई अर्चना निलेश देवकर (22) या दोघी माय (mother) लेकी केंद्राइ धरणातील (kedrai dam) पाण्यात बुडून मयत झाल्या.

या घटनेची माहिती मिळताच वडणेरभैरव चे सहा. पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी घटनास्थळी पोहचुन नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात (chandwad hospital) आणण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात ऊस आंदोलनाचा भडका उडणार

लातूरमध्ये कुरिअरच्या टेम्पोत भीषण स्फोट, भररस्त्यातील घटनेने सगळेच हादरले, VIDEO

Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई! कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

Ratnagiri Water Stock : रत्नागिरीकरांनो, पाण्याची चिंता मिटली! पुढील ५ महिने टेन्शन नाही, धरणांमध्ये किती साठा?

ICICI बँकेची दिवाळीपूर्वी मोठी घोषणा! FD च्या व्याजदरात वाढ, कोणत्या मुदत ठेवीवर किती व्याज मिळणार? वाचा

SCROLL FOR NEXT