लातूरमधील उमाटे कुरिअरच्या ठिकाणी कुरिअर घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये मोठा स्फोट झाला. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय. स्फोटाची तीव्रता पाहून घटनास्थळी तात्काळ फॉरेन्सिक पथक आणि दहशतवादी विरोधी पथक दाखल झाले. पोलीस प्रशासनाकडून या स्फोटाचं नेमकं कारण शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय.
स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक लॅब, दहशतवादविरोधी पथक, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एअरगनसाठी वापरण्यात येणाऱ्या कार्टिजिसमधील गॅसमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके याचा शोध घेत आहेत, अशी माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.