Goa ICU Horror Saam
महाराष्ट्र

गोव्यात परदेशी महिलेवर सोलापूरच्या डॉक्टराकडून बलात्कार; ICU रूममध्ये घाणेरडं कृत्य

Goa ICU Horror: गोव्यातील हेल्थवे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये परदेशी महिलेवर बलात्कार. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. सोलापुरातील डॉक्टरला ठोकल्या बेड्या.

Bhagyashree Kamble

  • गोव्यातील हेल्थवे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मोरोक्कन महिलेवर बलात्कार.

  • आरोपी डॉक्टर वृषभ दोशी (२८, सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली.

  • आरोपीने नर्सला बाहेर पाठवून तपासणीच्या बहाण्याने अत्याचार केला.

  • रुग्णालय प्रशासनाने आरोपीला निलंबित करून पीडितेला मदतीचं आश्वासन दिलं.

गोव्यात एक लज्जास्पद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या गोव्यातील हेल्थवे रूग्णालयात दाखल असलेल्या २४ वर्षीय मोरोक्कन महिला रूग्णावर आयसीयूमध्ये बलात्कार झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या घृणास्पद कृत्याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर येथील २८ वर्षीय डॉक्टर वृषभ दोशीला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. नंतर दिवार बेटाजवळील एका एनजीओच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोव्यात पोहोचली होती. प्रशिक्षणादरम्यान, तिची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने हेल्थवे रूग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये दाखल केले. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना, सोलापुरातील आरोपी डॉक्टर तपासणीच्या बहाण्याने आयसीयूमध्ये गेला. दुसऱ्या नर्सला बाहेर पाठवले. नंतर महिला रूग्णावर लैंगिक अत्याचार केला.

पीडितेनं पोलिसांना सांगितले की, जेव्हा डॉक्टर तिच्याकडे तपासणीसाठी आले, तेव्हा त्यांच्यासोबत एक नर्स देखील होती. परंतु, डॉक्टरांनी नर्सला बाहेर पाठवले. नंतर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी डॉक्टर गोव्यातून पळून गेला. नंतर तो थेट सोलापुरात गेला. पोलिसांनी डॉक्टराला तेथून अटक केली.

हेल्थवे हॉस्पिटल व्यवस्थापनाने या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. आरोपी डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. रूग्णालयाने पीडितेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. परदेशी महिलेवर रूग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची जोरदार तयारी; पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण | VIDEO

Airtel Recharge Offer: एअरटेलचा वार्षिक रिचार्ज प्लॅन; कॉलिंग, डेटासह मिळवा अनेक फायदे, किंमत किती?

Aetashaa Sansgiri : लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारा नवरा कोण?

Maharashtra Live News Update : वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

तटकरेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना धक्का, महत्त्वाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT