रूग्णाला ऑपरेशन बेडवर सोडलं, दुसऱ्या रूममध्ये नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवलं; डॉक्टरचा प्रताप

Doctors Affair During Surgery: पाकिस्तानी वंशाच्या वरिष्ठ डॉक्टरांचा प्रताप. रूग्णाला ऑपरेशन बेडवर सोडलं. दुसऱ्या रूममध्ये नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवलं.
Doctors Affair During Surgery
Doctors Affair During SurgerySaam
Published On
Summary
  • ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टर रुग्णालयातील धक्कादायक घटना.

  • पाकिस्तानी वंशाचे वरिष्ठ डॉक्टर सुहेल अंजुम यांनी ऑपरेशनदरम्यान रुग्णाला सोडले.

  • डॉक्टरांनी नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे कबूल केले.

  • प्रकरण कोर्टात गेले, डॉक्टर पाकिस्तानला परतले.

ब्रिटनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानी वंशाच्या वरिष्ठ डॉक्टरने एक भयंकर कृत्य केलं आहे. रूग्णाला ऑपरेशन दरम्यान मध्येच सोडून जवळच्या खोलीत जाऊन नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवले. या घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय पाहुयात.

हे संपूर्ण प्रकरण ग्रेटर मँचेस्टरमधील आहे. डॉ. सुहेल अंजुम असे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. सुहेल यांनी शस्त्रक्रियेदरम्यान, रूग्णाला अर्ध्यावरच सोडून दिले. त्या दिवशी ड्युटीवर त्यांच्या पाच शस्त्रक्रिया झाल्या होत्या. परंतु तिसऱ्या ऑपरेशन दरम्यान, त्यांनी ब्रेकघेतला. तसेच शस्त्रक्रियेची जबाबदारी दुसऱ्या नर्सकडे सोपवली.

Doctors Affair During Surgery
सायंकाळी उठला अन् घरासमोरील नाल्यात पडला; ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

यानंतर डॉक्टर दुसऱ्या ऑपरेशन रूममध्ये गेले. त्या ऑपरेशन रूममध्ये त्यांनी एका नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवले. एका स्क्रब नर्सने ट्रिब्युनलला सांगितले की, जेव्हा ती ऑपरेशन थिएटरमध्ये उपकरणे घेण्यासाठी गेली. तेव्हा तिने डॉक्टर आणि नर्सला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले.

Doctors Affair During Surgery
भाजपच्या माजी नगरसेवकानं नाशिकमध्ये खून केला; ठाकरे सेनेच्या खासदाराचा गंभीर आरोप

नर्सने ही घटना लगेच इतरांना कळवली. चौकशीदरम्यान, डॉ. सुहेल अंजुम यांनी कबूल केले की, रूग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये बेशुद्ध पडलेला असताना त्यांनी नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवले. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. सुनावणीदरम्यान, डॉ. सुहेल अंजुम म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून मी प्रचंड अस्वस्थ आहे. माझी पत्नी मेंटल ट्रॉमाचा सामना करत आहे. मला खरोखर वाईट आणि लाज वाटत आहे'. अंजुमने २०२४ मध्ये एनएचएस ट्रस्ट सोडले असून, ते आता पाकिस्तानला परतले आहेत.

Doctors Affair During Surgery
तक्रारदाराला बड्या नेत्यानं संपवलं, चारचाकीनं चिरडलं; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com