भंडारा - आपल्या विविध मागण्या घेऊन कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले हॉस्पिटल अटेंडेंट कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला आहे. थकित वेतनासह काम खंडित न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. (Morcha of contract hospital attendant employees for overdue wages and employment)
हे देखील पहा -
कोरोना काळात महामारी मध्ये रोग्याची सुश्रुता करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने हॉस्पिटल अटेंडेंट नियुक्त केले गेले असून त्यांचे 4 महिन्यांपासून वेतन थकले आहे. शिवाय त्यांची 1 आगस्ट पासून सेवाही समाप्त करण्यात येणार आहे. हा आमच्या वरील अन्याय असून सरकारने केवळ आमचा वापर करून घेतला असल्याच्या आरोप ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या कामाचा मोबदला म्हणून आमचे 4 महिन्यांचे थकित वेतन देण्यात यावे आणि आमची सेवा खंडित न करता आमचा रोजगार सूरु ठेवावा ही मागणी यावेळी करण्यात आली आहे
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.