Monsoon Update 2024 Saam TV
महाराष्ट्र

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Monsoon Update in Maharashtra : येत्या ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

मौसमी पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत मान्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात कोसळणार पाऊस

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम आणखीच वाढणार असून येत्या शुक्रवारपर्यंत (२४ मे) अनेक भागात तुफान पाऊस कोसळणार असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात सर्वांत अधिक अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट, तर कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी फळबागांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

हवामान खात्याने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याला येत्या २४ मेपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे.

मराठवाडा-विदर्भात तुफान पावसाची शक्यता

याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्याला पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येत्या ४८ तासांत मान्सून भारतात

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती असल्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे, तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल.

केरळमध्ये वेळेपूर्वीच दाखल होणार मान्सून?

वायव्य बंगालच्या उपसागरात २२ मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. २४ मे रोजी या दाबाचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊ शकते. या स्थितीची तीव्रता कायम राहिल्यास केरळमध्ये वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT