Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Rain Alert : अकोला जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्याला आज सायंकाळी 4 नंतर अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढलं.
Maharashtra Rain News
Maharashtra Rain News Saam Digital

अकोला जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्याला आज सायंकाळी 4 नंतर अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढले. या अवकाळी पाऊस आणि सोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली तर रुईखेड आणि पणज भागात केळी पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी, पुन्हा एकदा आस्मानी संकटाला समोर गेलाय. अकोट भागात 30 मिनिट पेक्षा जास्त वेळ हा मुसळधार पाऊस आणि जोराचा वारा सुरू होता. या पावसामुळे अनेकांचं नुकसान झालंय. सोबतच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.

नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात वादळ, अवकाळी पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी आदी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्येशेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

शनिवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेगाव, खामगाव परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र 31 मे ला वेळेवर केरळात मान्सून दाखल होणार आहे. दिवसा उन्हाचा तडका आणि संध्याकाळच्या सत्रात पाऊस त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.

Maharashtra Rain News
Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

छत्रपती संभाजीनगर जिह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण जिल्हाभरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. जिल्ह्यातील पाचोड,अडुळ,आणि घारेगाव या शिवारामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी मात्र शेतकऱ्यांच्या आंबा आणि उन्हाळी मक्का यांच्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान होणार आहे. दरम्यान या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाड देखील पडली होती.

Maharashtra Rain News
Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com