Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

Truck And Car Accident : अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाटाजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. निर्गुणा नदीच्या पुलावर तांदूळ वाहून नेणारा ट्रक आणि कारचा अपघात झाला. या अपघातात ४ जण जखमी झालेत.
Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी!  ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप
Truck And Car AccidentSaam Tv

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोला : 'देव तारी त्याला कोण मारी'! ही म्हण तुम्ही ऐकली असेल या म्हणीचा प्रत्यय पातुरमधील लोकांना आला. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाटाजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. निर्गुणा नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं पुलावरुन जात असताना हा अपघात झालाय. नदीवरील पूल अरुंद असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटला आणि ट्रक कारवर पलटी झाल्याने कार ट्रकखाली दबल्या गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नाहीये.

चान्नी फाटा जवळ असलेल्या निर्गुणा नदीच्या पुलावर तांदूळ वाहून नेणारा ट्रक आणि कारचा अपघात झाला. या अपघातात ४ जण जखमी झालेत. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटला आणि ट्रक कारवर पलटी झाला. कार पूर्णपणे दबल्या गेली. या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्यानं कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवानं या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नाहीये.

Accident
Truck And Car Accident

मिळालेल्या माहितीनुसार एम एस ४६ बी क्यू ०५८३ क्रमांकाची कार वाडेगावकडून पातुरकडे जात होती. तर क्रमांक जी.जे ३६ व्ही ५४८० ट्रकवरील पुलावर समोरासमोर धडक लागली. कार चालक शेख अमीर शेख जाकीर हा गंभीर जखमी तसेच रशीद शहा जाफर शहा हा तरुण जखमी झालाय. स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल केले.

निर्गुणा नदीच्या पुलावर ट्रक जागेवरच पलटी झाला तर कार पुलावर लटकली होती. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झालाय. अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे फुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर घटनेची माहिती मिळतात वाडेगाव पोलीस चौकीतील कर्मचारी गावंडे आणि अक्षय देशमुख घटनास्थळी दाखल झाले. अपघाती वाहनांना जेसीबीच्या मदतीनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी!  ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप
Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com