Monsoon Update Saam tv
महाराष्ट्र

Monsoon Update: आला रे आला, पाऊस आला; राज्याच्या काही भागात पावसाच्या आगमनाने नागरिक सुखावले

Monsoon Update: आजपासून विदर्भाच्या काही भागात मान्सूनचे आगमन होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Vishal Gangurde

Monsoon Update: पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विदर्भातील नागरिकांना पावसाचा मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून विदर्भाच्या काही भागात मान्सूनचे आगमन होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Latest Marathi News)

राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. विदर्भात काही भागात आज मान्सूनचे आगमन होणार आहे. पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

पावसामुळे नागपूरकर सुखावले

विदर्भात मान्सूनचे आगमन झाले आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मान्सून दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनची वाटचाल जोरात सुरू आहे. मुसळधार पावसाने विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाली आहे. यंदा उशिराने मान्सूनचं आगमन झालं आहे. पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा (Rain) हवामान खात्याने इशारा दिला आहे.

वाशिमध्ये जोरदार पाऊस बरसला...

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील चांडस परिसरात आज दुपारी जोरदार पाऊस बरसला. मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा आद्रा नशत्राकडे लागल्या होत्या. आज झालेला दमदार पाऊसाने शेतकरी सुखावला आहे. पाऊस बसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वर्धा जिल्ह्यात पावसाचे आगमन

वर्धा जिल्ह्यात सकाळी जोरदार पाऊस कोसळत होता. पावासामुळे वर्धा जिल्ह्यातील नागिराकांना दिलासा मिळाला आहे . मागील एका आठवड्यापासून नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video of Namaz at Shaniwarwada: 'ते' एक ट्विट आणि शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; ऐन दिवाळीत पुण्यातील वातावरण का तापले?

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

Leftover Chapati Recipe : रात्रीच्या चपात्या उरल्या? सकाळी नाश्त्याला बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

SCROLL FOR NEXT