सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांतल्या या दुर्घटना. वर्षा सहली कशा जीवघेण्या ठरतायेत हेच यातून समोर येतंय. निसर्गप्रेमींसह तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात वर्षा सहलीसाठी घराबाहेर पडतोय. मात्र जीवघेणं धाडस त्यांच्या जीवावर बेतू लागलंय.आता ही दृश्य नीट बघा. 22 वर्षीय ऋषी पथीपका मुंबईचा रहिवासी..मित्रांसोबत त्यानं रायगडच्या माणगाव तालुक्यातील चन्नाट इथला धबधबा गाठला.
मौजमजा करत त्यानं आपल्या मित्रांना पोहण्याचा व्हिडिओ काढायला सांगितला. मात्र धबधब्याखाली पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झालाय. या तरुणाचं धाडस त्याच्या जीवावर बेतलंय.
पर्यटकांचा ओढा असणाऱ्या रायगड जिल्ह्यातच गेल्या तीन महिन्यांत तेरा जणांचा मृत्यू झालाय. पर्यटकांचा आततायीपणा आणि स्थानिकांच्या सुचनेकडे केलेले दुर्लक्ष यामुळे वर्षासहली जीवघेण्या ठरू लागलेत. प्रशासनाकडूनही ठिकठिकाणी पर्यटकांसाठी प्रवेश बंदी करण्यात आलीय. तरीही पर्यटक धोकादायक ठिकाणी जातात. त्यामुळे पर्यटकांचा निष्काळजीपणा त्यांच्या जिवावर बेतू शकतो. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, सुचनांकडे दुर्लक्ष, भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नसणे अशी अनेक कारणं पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदा ठरतायेत. त्यामुळे पर्यटनाचा आनंद जरुर घ्या.मात्र नसतं धाडस करु नका. सतर्क रहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.