राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' जारी Saam Tv
महाराष्ट्र

राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

हवामान विभागाणं हा अंदाज वर्तवला असून ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान राज्यात पाऊस जोर धरणार आहे.

वृत्तसंस्था

मुंबई: राज्यात (Maharashtra) उद्यापासून सलग तीन दिवस पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाणं हा अंदाज वर्तवला असून ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान राज्यात पाऊस जोर धरणार आहे. मागच्या काही काळात पावसाची अनियमितता पाहायला मिळाली होती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाअभावी पिक जळून चालले होते. त्याचबरोबर मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

राज्यात आज बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये यलो अर्लट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर उद्या बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापुर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबरसाठी हवामान विभागानं पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

६ सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरसह, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाती शक्यता आहे. त्यामुळे यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT