द्राक्ष बागा वाचविण्यासाठी सोलापूरात इस्त्रायली तंत्राज्ञानाचा वापर

अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यापासून द्राक्ष बागेचे संरक्षण करण्यासाठी ‌शेतकऱ्यांनी चक्क इस्त्राईल तंत्रज्ञानाने तयार केलेल्या प्लाॅस्टीक कागदाचा वापर केला आहे.
द्राक्ष बागा वाचविण्यासाठी सोलापूरात इस्त्रायली तंत्राज्ञानाचा वापर
द्राक्ष बागा वाचविण्यासाठी सोलापूरात इस्त्रायली तंत्राज्ञानाचा वापर भारत नागणे
Published On

पंढरपूर: बदलत्या हवामानाचा (Climate Change) आणि तापमानवाढीचा सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष शेतीवर मोठा परिणाम झाला आहे, अशा परिस्थितीत द्राक्ष शेती (Grapes Farming) वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यापासून द्राक्ष बागेचे संरक्षण करण्यासाठी ‌शेतकऱ्यांनी चक्क इस्त्राईल तंत्रज्ञानाने तयार केलेल्या प्लाॅस्टीक कागदाचा वापर केला आहे. यामुळे द्राक्ष बागेचे संरक्षण तर झाले आहे.

शिवाय दर वर्षीपेक्षा या शेतकऱ्यांची द्राक्षे एक महिना लवकर बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. गुजरातनंतर प्लाॅस्टिक कागद‌ वापराचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील अजनाळे येथील शेतकऱ्यांनी प्रथमच द्राक्ष बागेसाठी केला असून त्याचे आता चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

द्राक्ष बागा वाचविण्यासाठी सोलापूरात इस्त्रायली तंत्राज्ञानाचा वापर
पालघरमधील कंपनीत मोठा स्पोट; दोन मृत्यू तर पाच गंभीर जखमी

डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनासाठी सोलापूर जिल्हा राज्यात आग्रेसर मानला जातो. मागील काही वर्षापासून सततच्या बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेती संकटात आली आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान झालं होतं. हातातोंडीशी आलेलं द्राक्षाचं उभ पीक जमिन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

दवर्षी अवकळी पावसामुळे द्राक्षाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अजनाळे येथील प्रयोगशील शेतकरी योगेश जगदाळे यांनी आपल्या सहा एकर द्राक्ष बागेवर इस्त्राईल तंत्रज्ञानाने तयार केलेला प्लॅास्टिक कागद टाकून बागेचे संरक्षण केले आहे. परिणामी गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागेचे संरक्षण करण्यात त्यांना यश आलं आहे. शिवाय विविध किड रोगापासून बागेचे संरक्षण करण्यात देखील हे शेतकरी यशस्वी ठरले आहेत.

प्लाॅस्टिक कागदाचे बागेत अनेक चांगले परिणाम दिसू लागले आहेत. द्राक्ष गडांचे चांगले सेटींग झाले, असून निर्यातक्षम द्राक्ष तयार होण्यास मदत झाली आहे. शिवाय किडरोग नियंत्रणाच्या फवारणी खर्चात देखील मोठी बचत झाली आहे. बागेच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या या प्लाॅस्टिक कागदासाठी एकरी तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. योगेश जगदाळे यांनी 24 लाख रुपये खर्च करून सहा एकर द्राक्ष बागेवर या प्लॅस्टिक कागदाचा वापर केला आहे. त्यांच्या या प्रयोगाचे परिसरातील इतर शेतकऱ्यांनी अनुकरुन करुन द्राक्ष बागेचे पाऊस आणि इतर किडरोगापासून संरक्षण केले आहे.

द्राक्ष बागा वाचविण्यासाठी सोलापूरात इस्त्रायली तंत्राज्ञानाचा वापर
डोंबीवलीत जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

प्लाॅस्टिक कागदाचा खर्च मोठा आहे, लहान शेतकर्यांना तो परवडणारा नाही.त्यामुळे राज्य सरकारने प्लाॅस्टिक कागद खरेदीसाठी 50 टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी राजेंद्र यलपले यांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com