Monsoon Weather Report Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon 2025: गुड न्यूज! १३ मेपर्यंत मान्सून अंदमनात धडकणार, महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

Monsoon Weather Report: महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होणार आहे. येत्या १३ मेपर्यंत मान्सून अंदमनात धडकणार आहे. त्यानंतर हळूहळू पुढे सरकरत तो केरळात दाखल होईल.

Priya More

मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावर्षी मान्सून लवकरच दाखल होणार आहे. मान्सून १३ मेपर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा ८ ते १० दिवस आधीच आगमन होणार असल्याची माहिती पुण्याच्या हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता आहे.

महत्वाचे म्हणजे, अंदमान- निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. हवेचे दाब कमी झाल्याने मान्सूच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात आले आहे. सलग ५० दिवस चाललेल्या उष्णतेचा परिणाम झाल्याने मान्सून यावर्षी १० दिवस आधी अंदमान-निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यावर्षी देशामध्ये १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा एल निनोचा प्रभाव नसल्याने आणि ला निना सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे हवामान खात्याने सांगितले. यंदा मान्सून १३ मेपर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्यामुळे यावर्षी १० दिवस आधीच मान्सून सगळीकडे दाखल होणार आहे.

यावर्षी पन्नास दिवस देशभरामध्ये उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापले होते. बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे संपूर्ण देशाभोवती बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. याच कारणामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे.

मान्सून दरवर्षी अंदामान-निकोबार बेटावर १८ ते २२ मेच्या सुमारास येतो. पण यावर्षी तो १० दिवस आधीच दाखल होणार आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण देखील अंदामान-निकोबार बेटावर तयार होण्यास सुरूवात झाली आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्ये ५ ते ६ दिवसांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT