Monsoon 2025 Update Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon 2025 Update: आनंदाची बातमी! मान्सून अरबी समुद्रात दाखल, १ जूनला केरळमध्ये; महाराष्ट्रात कधीपर्यंत येणार?

Monsoon Arrives Arabian Sea: मान्सूनबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. हळूहळू मान्सून पुढे वाटचाल करताना दिसत आहे. मान्सून महाराष्ट्रात कधीपर्यंत दाखल होणार ते घ्या जाणून....

Priya More

शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून आज अरबी समुद्रात दाखल झाला. १ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं देखील हवामान खात्याने सांगितले.

उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच मान्सूनबाबत आनंदवार्ता आली आहे. हवामानतज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी मान्सूनबाबत महत्वाचे अपडेट दिले आहेत. होसाळीकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, 'अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून आज अरबी समुद्रात पोहचला आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकरत आहे. मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकता दिसत आहे.'

मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर त्याची पुढची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू होईल. ५ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. ५ जूनला मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर हळूहळू तो १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण मान्सूनची माहिती मिळताच शेतकरी शेतीच्या कामाला लागतात. दरम्यान, सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.

वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अशामध्ये पुढचे ४ ते ५ दिवस खूपच महत्वाचे आहे. हवामानतज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशामध्ये ढगांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी घराबाहेर जाणं टाळावं आणि झाडाखाली उभे राहू नये.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

SCROLL FOR NEXT