Mohan Bhagwat  Saam Digital
महाराष्ट्र

Mohan Bhagwat : सरसंघचालकांच्या सरकारला कानपिचक्या; केंद्रीय नेतृत्वावर संघ नाराज?

RSS Chief Mohan Bhagwat : काम करा मात्र अहंकार बाळगू नको, असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजकारण्यांना केलंय. तसंच मोहन भागवत यांच्याच आशीर्वादानंच सरकार सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय.

Sandeep Gawade

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

काम करा मात्र अहंकार बाळगू नको, असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजकारण्यांना केलंय. तर जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला काढा, असं आवाहन संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना केलंय.. तसंच मोहन भागवत यांच्याच आशीर्वादानंच सरकार सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्र सरकारचे कान पिळलेत.नागपूरमध्ये रेशीमबाग मैदानात झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना सरसंघचालक भागवतांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी हिंसाचारानं होरपळत असलेल्या मणिपूरात शांतता प्रस्थापित करण्याची सूचना भागवतांनी केली. त्यासह सहमतीनं देश चालवा असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

एकीकडे लोकसभा निवडणूक सुरु असताना भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष जे,पी.नड्डांनी संघाची आता भाजपला गरज नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन बरीच राळ उठली होती. त्यात आता सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना जोरदार कानपिचक्या दिल्यात. त्यामुळे लोकसभा निवडणुकी दररम्यान आणि त्यानंतर आलेल्या निकालाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज आहे का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित होऊ लागला आहे. याआधीही भागवतांनी मोदी सरकारच्या न पटलेल्या धोरणांवर टीका केल्याच दिसून आलंय. त्यातच भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानचं भाजपला कानपिचक्या दिल्यानं विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय.

दहा वर्षांपासून भाजप पूर्ण बहुमतात असलेलं मोदी सरकार होतं. मात्र आता केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार अस्तित्वात आलंय. त्यामुळे मित्रपक्षांच्या सहमतीनं सरकार चालवणं गरजेचं आहे. अशावेळी सरसंघचालकांनी संसदही सहमतीनं चालवण्याचा कानपिचक्या दिल्यानं आता केंद्रीय नेतृत्वाच्या कार्यशैलीकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला 'तीन'ची सुट्टी

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगता येतं? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

Hingoli : तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकले सडलेले सोयाबीन; हिंगोली, सेनगाव तालुके वगळल्याने शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT