सहकाराला जगवण्याचं काम मोदींनी केलं - देवेंद्र फडणवीस Saam Tv
महाराष्ट्र

सहकाराला जगवण्याचं काम मोदींनी केलं - देवेंद्र फडणवीस

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

शिर्डी: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा आज नगरच्या दौऱ्यावर आहेत. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतले. अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्या निमित्ताने भाजपचे अनेक नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) तसेच माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे देखील आज शिर्डीत पोहोचले. यावेळी आपल्या भाषणामध्ये फडणवीसांनी सहकार क्षेत्रातील मोदी सरकारची कामगिरी आणि त्याबद्दल केलेल्या कार्याची माहिती दिली. (Modi did the work of keeping the cooperation alive - Devendra Fadnavis ab95)

हे देखील पहा -

देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच भूमीवर देशाचे पाहिले सहकार मंत्री हे सहकार परिषद घेताय, हा विलक्षण योगायोग आहे. अमित शहा यांचं मूळ हे सहकार असून, सहकाराच्या मुळापर्यंत शहा यांना जाणीव आहे. अमित शहा यांनी आयकर विभागाच्या जाचातून साखर कारखान्यांची सुटका केली. आम्ही यासाठी अनेक वर्षे भांडलो, आमच्या सरकारनं सहकाराला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. सहकाराला जगवण्याचं काम मोदींनी केलं, मोदींच्या (PM Modi) इथेनॉल नितीमुळे साखर कारखान्यांचे दिवस पालटले असंही फडणवीस आहेत.

अमित शहा यांच्या दौऱ्या दरम्यान 20 ते 25 हजार जण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत, असं नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रात प्रथमचं स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शाह पहिल्यांदाचं प्रवरानगरला सहकार परिषदेसाठी आले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT