Maharashtra News Live Update: नाशिक आणि जळगाव विधानपरिषदेचा तिढा सुटेल-श्रीकांत शिंदे

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ अन् विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update:
Maharashtra Live News Update: Saam TV Marathi
Published On

नाशिक आणि जळगाव विधानपरिषदेचा तिढा सुटेल-श्रीकांत शिंदे

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नासिक व जळगाव या दोन जागांसाठी तिढा निर्माण झाला असून, महायुतीचेच उमेदवार समोरासमोर उभे ठाकले असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुतीचे मंत्री व नेत्यांमध्ये हा तिढा सोडवण्यासाठी चर्चा सुरू असून, लवकरच यावर तोडगा निघेल व सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिंदे सेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे

Amravati: नीट पेपर फूटीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये एनएसयूआयचे जयस्तंभ चौक येथे चक्काजाम आंदोलन

अमरावती -

नीट पेपर फूट मुद्द्यावरून अमरावतीमध्ये एनएसयूआयचे जयस्तंभ चौक येथे चक्काजाम आंदोलन

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी

चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत

NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद राठोड यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर

Sangli: सांगली -मिरजसह जिल्ह्यात मान्सून पावसाची दमदार हजेरी

सांगली -मिरजसह जिल्ह्यात मान्सून पावसाची दमदार हजेरी

सांगली जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे.

सांगली शहराचा मिरज शहरामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सांगलीमध्ये ही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Pune:  वादळी पावसाचा गोलेगावला फटका, झाड कोसळून दुभत्या गायीचा मृत्यू

वादळी पावसाचा गोलेगावला फटका; झाड कोसळून दुभत्या गायीचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लिंबाचे झाड अंगावर कोसळल्याने एका दुभत्या गायीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बारामतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नागरिकांची धावपळ

बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वेगवान वाऱ्यांमुळे रस्त्यालगतची झाडे डोलू लागली, तर उभी असलेली वाहनेही हलताना दिसली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. दरम्यान, काही भागांत वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संगमनेरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट; घरांचे पत्रे उडाले, नागरिकांचे मोठे नुकसान

संगमनेर तालुक्यातील साकूर परिसराला वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीचा जोरदार फटका बसला. सुमारे तासभर सुरू असलेल्या वादळी पावसामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांची धावपळ उडाली. जांबुत खुर्द आणि जांबुत बुद्रुक गावांमध्ये अनेक घरांचे पत्रे व कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. दस्तगीर शब्बीर पठाण आणि चांदबी फारुक सय्यद यांच्या घरांचे विशेष नुकसान झाले असून घरातील साहित्यही पावसात भिजून गेले. त्यामुळे नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

विरारमध्ये गायींच्या तबेल्यावर कारवाईनंतर वाद; महापालिकेसमोर गायी बांधून निषेध

विरारच्या शनी मंदिर परिसरातील अवैध गायींच्या तबेल्यावर वसई-विरार महापालिकेने कारवाई केल्यानंतर वाद चिघळला आहे. कारवाईदरम्यान स्थलांतरित करण्यात आलेल्या तीन गायी आणि तीन वासरे गोरक्षक संघटनांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर आणून बांधली. पावसाळ्याच्या तोंडावर पुनर्वसनाची व्यवस्था न करता कारवाई केल्याचा आरोप करत संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडच्या पायथ्याशी दाखल

० शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडच्या पायथ्याशी दाखल

० छत्रपती संभाजी राजे पायी मार्गाने चालत किल्ले रायगडावर निघाले

० किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या नाणे दरवाजा मार्गाने राजेंची शिवभक्तांकडून ओवाळणी

० हजारो शिवभक्त राजेंच्या सोबत किल्ले रायगडाकडे पायी निघाले

० आपण पर्यटनासाठी नाही तर शिवराज्याभिषेकासाठी आलो आहोत, गडावर कचरा करू नका असा देशभरातुन आलेल्या शिवभक्तांना छत्रपती संभाजी राजेंचा मोलाचा सल्ला

० मी जसा आनंद लुटतो आहे तसा आनंद लुटा जल्लोश करा

अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

विटांनी भरलेला ट्रक पुलाखाली कोसळला.

एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी.

अपघात परतवाडा–चांदूरबाजार मार्गावरील पेडी नदी पुला वर घडला आपघात.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता.

ट्रकने पुलावरील सुरक्षा कठडा तोडून थेट नदीपात्रात घेतली झेप.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

पोलीस,बचाव पथक,रुग्णवाहिका व जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य.

जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू,मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू.

शिरूरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुणे-आहिल्यानगर महामार्गावर झाड कोसळल्याने काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. झाड हटवण्यात यश आले असले तरी पावसामुळे वाहनचालकांना अद्यापही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

नागपुरात अवैध कत्तलखान्यांविरोधात विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन ....

- शहरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ....

- प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका ...

- संघ मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या बडकस चौकात विश्व हिंदू परिषदेच आंदोलन..

TCS महिला कर्मचाऱ्यांचं शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात नवा खुलासा

- पीडित तरुणीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून धर्मांतरण

- धर्मांतरणासाठी झाकीर नाईकच्या व्हिडिओचा वापर

- झाकीर नाईकचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत उपलब्ध

- पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात जाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख

नंदुरबार शहरात पुरणपोळी तयार करणाऱ्या लाडक्या बहिणींशी श्रीकांत शिंदेंनी साधला संवाद

चुलीवर तयार केली जाणारी पुरण पोळी चे खासदार श्रीकांत शिंदेंना आकर्षण....

मंत्री दादा भुसे,माजी आमदार शिरीष चौधरी यांचा सोबत जाऊन घेतली पुरण पोळी तयार करण्याची प्रक्रिया...

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कृतीची एकच चर्चा....

पुणे पुण्यात मनसे ची इंटिग्रेटेड कॉलेजवर धाड

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना इंटिग्रेटेड कॉलेज विरोधात आक्रमक

पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या एका बेकायदेशीर स्टडी सेंटर विरोधात आक्रमक

शिक्षण विभागासह पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा मनसेचा आरोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची राजकीय रंगत वाढली असून या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. आज या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार कल्याण काळे यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्याचे म्हटले.

कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये भाव द्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

राज्य सरकारने शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा, पण हा शासन निर्णय अद्याप कागदावरच असल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

कांद्याचा उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय.. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला प्रति क्विंटल किमान दोन हजार रुपये भाव जाहीर करावा, अशी मागणी श्रीरामपूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे..

शिवसेना शिंदे गट नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद नंदुरबार दौरा

शिवसेना शिंदे गट नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद नंदुरबार दौरा

दौऱ्या दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत नंदुरबार मध्ये बैठक सुरू

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना बूथस्तरापर्यंत सक्षम करण्यासाठी बैठक

बैठकीला शिक्षण मंत्री दादा भुसे,आमदार आनंद परांजपे, आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमश्या पाडवी मंचावर उपस्थित

शिरूर बसस्थानकातून दुचाकी लंपास; सीसीटीव्हीत कैद प्रकार, चोरट्यांना कायद्याचा धाक नाही? 

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्याने दुचाकी पळवली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे चोरट्यांना कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मैत्रीला काळिमा! वर्गमित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून केला खून

आंबेगाव तालुक्यातील गोणवडी आयटीआयमध्ये मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एकत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानेच आपल्या वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून केल्याने खळबळ उडाली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची फसवणूक; सरसकट कर्जमाफी करा  – जयश्री शेळके 

राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून, सरकारला शेतकऱ्यांविषयी खरोखरच संवेदनशीलता असेल तर संपूर्ण सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी उबाठाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली.

वसई पूर्वेतील नेल पॉलिश उत्पादन कंपनीला भीषण आग

वसई पूर्वेतील सातिवली येथील धुरी-2 औद्योगिक परिसरातील नेल पॉलिश उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. आज दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच वसई-विरार महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्यावर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जागतिक पर्यावरणाचा दिवशीच नंदुरबारमध्ये शेकडो झाडांची कत्तल 

जागतिक पर्यावरणाचा दिवशीच नंदुरबार मध्ये शेकडो झाडांची कत्तल....

महामार्गाचा चौपदरीकरणाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या झाडांची वृक्षतोड.....

महाराष्ट्र ,मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला जोडणारा विसरवाडी खेतिया रस्त्याचं चौपदरी करण्याचं काम सुरू....

मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे जिल्ह्याचा पर्यावरणाला धोका.....

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदासाठी अंबादास दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींवरही भाष्य केले.

विधान परिषद रणधुमाळीत धैर्यशील मोहिते-पाटील यांची पत्रकार परिषद; राजकीय समीकरणांवर भाष्य

सोलापूर विधान परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने माढा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची पत्रकार परिषद

सोलापूर विधान परिषद निवडणूकीत भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी SP चे वसंत देशमुख यांच्यात होत आहे थेट लढत

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डोंबिवलीत एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डोंबिवलीत एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपण,

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण

शक्तिपीठ महामार्ग मोजणीला शेतकर्यांचा विरोध

शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढू लागला आहे.

आज माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील शेतकर्यांनी जमीन मोजणीला विरोध केला आहे.

आज एम एस आरडीचे अधिकारी पोलिस बंदोबस्तात मोजणीसाठी आले असता शेतकर्यांनी अधिकाऱ्यांना हुसकावून लावले.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढू लागला आहे

Arvind Mhatre : अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

शेतकरी कामगार पक्षाचे नेते अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा ( Arvind Mhatre Resigned )

तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीमध्ये (MLC Nivdnuk) शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर काल त्यांनी उमेदवारी माघार घेतली

MLC Election : मुनगंटीवार निवडणूक आयोगावर कडाडले

वारंवार निवडणुका आणि त्यानुषंगाने लागणारी आचार संहिता, यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आज चांगलेच कडाडले.

वर्षभर आचार संहिता लागू राहणार असेल तर कामे करायची कशी, असा सवाल करीत त्यांनी ही आचार संहिता गाढून टाकली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

आमदार व्हायचे असेल तर तर थेट जनतेतून निवडून यायला हवे. यासंदर्भात मी केंद्र सरकारला पत्र पाठवणार असल्याचेही ते म्हणाले.

Chandrapur : ब्रम्हपुरी विभागात वाळू तस्करांचे थैमान

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरू आहे.

या नदीच्या वाळूला मोठी मागणी असल्याने वाळू तस्करांचे मोठे रॅकेट इथे सक्रिय आहे.

प्रशासनाच्या डोळ्यादेखत ही चोरी होत असतानाही राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नसल्याचे चित्र इथे बघायला मिळत आहे.

मागील अनेक महिन्यांपासून ही चोरी सर्रास सुरू आहे. त्याविरोधात आता ठाकरे सेनेने आंदोलन सुरू केले आहे.

आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. विधान परिषदेचे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रमोद जठार यांनी पहिल्यांदाच राजकोट किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्या आमदारकीचा सुरुवातीचा १ कोटींचा निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी देणार असल्याची घोषणा केली. सुशोभीकरणा अतर्गत लेझर लाईट व साउंड शो मुळे राजकोट येथील महाराजांच्या स्मारकाला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जठार यांनी सांगितलेय.

रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, कर्जदारांना मोठा दिलासा

पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

या भीषण आगीत 3 जण गंभीर जखमी

खराडी परिसरात एका रहिवासी इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आग

सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना

जखमी झालेल्या एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती

अग्निशमन दलाकडून आगीवर वेळेत नियंत्रण

आगीत इमारतीमधील दोन फ्लॅट जळून खाक

अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या विशेष वसुली मोहिमेत मोठी कारवाई करत दोन मालमत्ता सील केल्या.

आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार मध्य झोन क्र. 2 अंतर्गत राजापेठ विभागात ही कारवाई करण्यात आली.

पोलीस भरतीत २५-२५ गुणांच्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करा

मलकापूर येथे लीगल फायटर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. स्नेहल तायडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत शासन निर्णयानुसार सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि मराठी व्याकरण या चारही विषयांना प्रत्येकी २५ गुणांचे समान वाटप करण्याची मागणी करण्यात आली. मागील काही वर्षांपासून प्रश्नपत्रिकांमध्ये विषयनिहाय गुणांचे असमान वाटप होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेचा खून

सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेचा खून करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनंदा पाटील असे मृत महिलेचे नाव असून ती अलिबाग तालुक्यातील सारळ येथील रहिवासी आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी तिनविरा येथील अनदर्श शेडगे आणि रितेश लोहार या दोघा तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेण्याकरिता या दोघांनी तिला घरी बोलावून घेतले आणि निर्जन स्थळी नेवून तिचा खून केला. पोलिसांनी सर्च आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने खोल दरीतून या महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

रत्नागिरी शहरावर पाणी टंचाईची टांगती तलवार

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा अत्यंत खालावल्याने शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. मान्सून लांबल्याने आणि उन्हाचा तडाखा कायम असल्याने धरण परिसरातील पाणी पातळीने नीचांकी पातळी गाठली आहे. उपलब्ध पाणीसाठा पाहता आता शहराला ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाची टांगती तलवार नागरिकांवर आहे.सद्यस्थितीत शीळ धरणात केवळ ०.५८ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. शहराची पाण्याची दैनंदिन गरज प्रतिदिन १९ ते २० दशलक्ष लिटर इतकी आहे, हे पाहता हा साठा जास्तीत जास्त १५ ते २० दिवस पुरेल इतकाच आहे. सध्या आठवड्यातून एकदा पाणीकपात करून परिस्थिती हाताळली जात असली, तरी पाऊस लांबल्यास हे नियोजन अपुरे पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोणार सरोवराचा जागतिक वारसा दर्जाचा प्रवास अद्याप अधांतरी

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा युनेस्कोच्या नव्याने जाहीर झालेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेला नाही. उल्कापातातून निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगातील महत्त्वाच्या भूवैज्ञानिक वारसांपैकी एक मानले जाते. नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असूनही जागतिक वारसा दर्जासाठीचे प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे लोणारकरांची प्रतीक्षा आणखी वाढली असून, भविष्यात या अद्वितीय स्थळाला जागतिक वारसा दर्जा मिळावा, अशी मागणी लोणारकर करीत आहे.

FDA ची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धडक कारवाई,

अन्न व औषध प्रशासनाने समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या एका वाहनाला अडवून प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंदोरहून पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाचा सावंगी ते माळीवाडा टोलनाक्यादरम्यान पाठलाग करून वाहन ताब्यात घेण्यात आले. वाहनातून सुमारे 42 लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा तसेच 18 लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले असून, एकूण 60 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

जालन्यात पोलिस आणि महसूलच्या पथकाने वाळू माफियांना दणका दिलाय . गोंदी पोलिस आणि महसूल पथकाने कारवाई करत 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध वाळू चोरीचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आणि महसूल पथकाच्या या कारवाईमुळे जालन्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

कोल्हापूर तवंदी घाटात मुसळधार पाऊस, महामार्गावर पाण्याचा लोट

पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील निपाणीजवळच्या तवंदी घाट परिसरात काल सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या काही वेळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी थेट महामार्गावरून वाहू लागले. घाटातील डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल तसेच महामार्गाच्या कामासाठी ठेवण्यात आलेले बांधकाम साहित्य वाहून रस्त्यावर आले. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. एका बाजूच्या मार्गावर पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दुसऱ्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. तवंदी घाट परिसरातील मुसळधार पावसाचे हे दृश्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com