''सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकार 24 तास उपलब्ध; राजकारण सोडून पुढे या''

सहकाराला मदत करण्यासाठीच मोदींनी हे मंत्रालय बनवलं.
''सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकार 24 तास उपलब्ध; राजकारण सोडून पुढे या''
''सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकार 24 तास उपलब्ध; राजकारण सोडून पुढे या''Saam TV
Published On

अहमदनगर : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा आज नगरच्या दौऱ्यावर आहेत. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी 12 वाजता प्रवरानगरला अमित शहा यांच्या उपस्थितीत सहकार परिषद आणि शेतकरी मेळावा पार पडणार पडला. या परिषदेत बोलताना अमित शहा (Amit Shah) सहकारमधील अनेक मुद्द्यांवर बोलले. उपस्थित सर्वांना नमस्कार करून शहा यांनी भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या भूमीवर आल्यानं अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) शहांनी अभिवादन केले. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून विश्व कल्याणाची प्रार्थना केली, साईबाबांनी सर्वांना श्रद्धा सबुरीचा मंत्र दिला, त्यांनाही शहांनी प्रणाम केला.

''सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकार 24 तास उपलब्ध; राजकारण सोडून पुढे या''
MPSC चा भोंगळ कारभार; इतिहासात पहिल्यांदाच तीन वेळा प्रसिद्ध केली उत्तरसुची

सहकारासाठी मोदी सरकार 24 बाय 7 उपलब्ध...

सहकाराला मदत करण्यासाठीच मोदींनी हे मंत्रालय बनवलं. सबका साथ सबका विकास हे सहकारातून शक्य हे मोदींनी जाणलं. कधी काळी महाराष्ट्रातील जिल्हा बँकां या आदर्श होत्या मात्र जिल्हा बँकांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला हे भ्रष्टाचार कोणी केले. आता सरकार आपल्या सोबत, मात्र पारदर्शपणा आणावा लागणार आहे. सहकारात पारदर्शकता आणण्याची गरज आहे सहकाराला पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांना स्वतःमध्ये परिवर्तन करावं लागेल. सहकासाठी मोदी सरकार २४ बाय ७ उपलब्ध असणार असेल अशी हमी अमित शहांनी दिली आहे.

''सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकार 24 तास उपलब्ध; राजकारण सोडून पुढे या''
MPSC चा भोंगळ कारभार; इतिहासात पहिल्यांदाच तीन वेळा प्रसिद्ध केली उत्तरसुची

31 टक्के साखरेचे उत्पादन सहकारी साखर कारखाने करतात...

लिज्जत पापड, अमूलचा अभ्यास करायला जगभरातून लोक येतात. देशात 31 टक्के साखरेचे उत्पादन सहकारी साखर कारखाने करतात. देशात 20 टक्के दूध सहकाराच्या माध्यमातून विकलं जातं. अनेक क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत आहे. लवकरच साखर कारखान्यांवरील संकट रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून दूर करणार असल्याची ग्वाही अमित शहांनी दिली. रिझर्व्ह बँकेकडून साखर कारखान्यांना लवकरच मदत करणार आहे. साखर कारखाने सुरू राहावेत यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. मी सहकार तोडायला नाही, तर जोडायला आलो आहे. पण राज्य सरकारनेही राजकारणापलीकडे जाऊन याचा विचार करायला हवा असे अमित शहा म्हणाले.

मी मूक प्रेक्षक म्हणून बघू शकत नाही

मला सल्ला देण्याऐवजी तुम्ही स्वतः पाहा. मी मूक प्रेक्षक म्हणून बघू शकत नाही. सहकार कोण चालवतय, यापेक्षा कसं चालवताय याला जास्त महत्त्व आहे. राजकारण सोडून सहकार चळवळीसाठी काम करण्याते आवाहन शहांनी यावेळी केले. माझ्या समोर एखादा विषय आला तर सहकारी संस्था कोण चालवत आहे, यापेक्षा कसा चालतोय हे मी बघणार. पण राज्य सरकारने देखील हेच करावं असंही शहा म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com