manse-bjp Saam
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजप - मनसेत बॅनर वॉर! मनसेचं भाजपला सणसणीत प्रत्युत्तर; फोटो व्हायरल

MNS Hits Back at BJP Over Hindi Imposition With Eye-Catching Banners: राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरला उत्तर म्हणून मनसेनेही दादरमध्ये जोरदार बॅनरबाजी केलीय.

Bhagyashree Kamble

राज्यातील सामान्य नागरिकांसह राजकारण्याचं लक्ष सध्या ठाकरे बंधूंच्या युतीवर आहे. ठाकरे कुटुंबातील कलहावर पडदा पडणार का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडलाय. एकिकडे सत्ताधारी नेते मंडळी ही युती होणं अशक्य म्हणत आहेत. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. याच बॅनरला मनसेनं प्रत्युत्तर दिलंय. हिंदी सक्तीवरून हे बॅनर वॉर सुरू असून, या बॅनरची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपने २१ एप्रिलला हिंदी भाषेच्या सक्तीवरून दादरला बॅनर लावले होते. हे बॅनर त्यांनी राज ठाकरे यांच्या बंगल्याजवळील हाकेच्या अंतरावर लावले होते. 'ही नव्हे भाषेची सक्ती..ही तर महाराष्ट्राची भक्ती' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरला आता मनसेनं प्रत्युत्तर बॅनरद्वारेच दिलं आहे.

'हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर, सक्ती आहे', अशा आशयाचे बॅनर मानखुर्दमधील अनेक चौकात लावण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हे बॅनर भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनर शेजारीच लावण्यात आले आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीवरून दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर सुरू असून, जर ठाकरे बंधूंमध्ये युती झाली तर, भाजप आणि मनसेमध्ये मिठाचा खडा पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाकरे बंधू परदेशात

ठाकरे बंधूंच्या युतीवरून राज्यातील राजकारणामध्ये अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. अशातच राज ठाकरे विदेश दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेही परदेशात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही चुलत भावांमध्ये परदेशात युतीची चर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT