Palghar Saam TV
महाराष्ट्र

Palghar: मनसे पदाधिकाऱ्याची मुजोरी; डॉक्टरला बेदम मारहाण; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आला समोर

मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Ruchika Jadhav

Palghar: पालघरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर येथील मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची तोडफोड करत एका डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे . (Latest Palghar News)

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल शिंदे असं मारहाण झालेल्या डॉक्टरांच नाव असून त्यांचं बोईसर परिसरात शिंदे रुग्णालय आहे. समीर मोरे यांनी ही बेदम मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांकडून करण्यात आला असून या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना गुजरातमधील वापी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मारहाणीचा हा व्हिडिओ रुग्णालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मारहाण आणि रुग्णालयाच्या तोडफोडी प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या बोईसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या मारहाणीनंतर बोईसर आणि परिसरातील डॉक्टरांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय.

का केली मारहाण?

मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी कोरोनाकाळतील बिलांची मागणी केली होती. कोरोना काळातील पेंडिंग असलेल बिल ते डॉक्टर स्वप्निल शिंदे यांच्याकडे मागत होते. हे बिल न दिल्याने समीर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना रुग्णालयात बोलावले आणि स्वप्निल शिंदे यांना धमकी देण्यास सुरूवात केली. यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली. त्यानंतर समीर मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट डॉक्टर स्वप्निल शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT