MNS President Raj Thackeray, Chiplun saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray Kokan Daura News : 'अजित पवार अँड गॅंग बिनखात्याचे मंत्री'; राज ठाकरेंचे मुसळधार पावसात चिपळूणात स्वागत (पाहा व्हिडिओ)

राज ठाकरे यांचे पावणे बारा वाजता चिपळूणमध्ये आगमन झाले.

अमोल कलये

Raj Thackeray Kokan Daura : मातोश्रीने आम्हांला दिलेला त्रास आम्ही विसरू शकत नाही. पण राज ठाकरे (raj thackeray) घेतील तो निर्णय अंतिम असेल अशी भावना मनसेचे नेते अविनाश जाधव (mns avinash jadhav) यांनी उद्धव (uddhav thackeray) आणि राज (raj thackeray) एकत्र येण्यावर दिली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दाै-याच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे मनसैनिकांनी जाेरदार तयारी केली आहे (Maharashtra News)

आजपासून (गुरुवार) दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मनसैनिक सज्ज झाले आहेत. चिपळूण, खेड दापोली आणि मंडणगड असा त्यांचा दौरा असणार आहे.

पक्ष कार्यालय उद्घाटन आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांची दौ-यादरम्यान ते भेट, बैठका घेणार आहेत. राजकारणातील सध्य स्थिती पाहता राज ठाकरे यांच्या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. चिपळूण येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हिंदू धर्मरक्षक अशा मथळ्याखाली बॅनर लावण्यात आले आहेत. ठिक ठिकाणी मनसेचे झेंडे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत.

राज ठाकरेंचे मुसळधार पावसात स्वागत

राज ठाकरे यांचे पावणे बारा वाजता चिपळूणमध्ये आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात मनसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. मुसळधार पावसात राज ठाकरे यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले.

बिनखात्याचे मंत्री

दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी सध्या सुरु असलेल्या राजकीय घडमाेडींवर बाेलताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची टीम बिनखात्याचे मंत्री आहेत. हे सर्व लाेकांची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT