Raj Thackeray Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News:...तर हा शरद पवारांचा 'मास्टरस्ट्रोक'; निवृत्तीच्या निर्णयावर मनसेची सावध प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतावर होण्याच्या निर्णयावर मनसे आमदार राजू पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिला आहे.

Vishal Gangurde

अभिजित देशमुख

Raju Patil News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. शरद पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतावर होण्याच्या निर्णयावर मनसे आमदार राजू पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे . (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर राजकीय घडोमोडींना वेग आला आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी फेरविचार करावा, असा सल्ला दिला आहे.

अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी मास्टरस्ट्रोक खेळला असेल, अशी सावध प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

आमदार राजू पाटील म्हणाले, 'शरद पवार यांचा अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून बोलायचं झालं तर एक व्यक्ती एक माणूस म्हणून बोलायचं झालं, तर त्यांचं वय किंवा त्यांना असलेला आजार याचा विचार करून हा निर्णय घेतला असावा. शरद पवार हे कामात वाघ आहेत, ते काम करतात. मात्र, कुठेतरी थांबायला हवं त्यामुळे ते थांबले असावेत'.

'शरद पवार यांच्या इतपत मोठी मी नाही. मात्र, एकंदरीत ज्या हालचाली चालल्या होत्या, ऐकण्यात येत होतं. कदाचित अफवा असतील तर त्या कुठेतरी थांबावेत, त्यासाठी त्यांनी मास्टरस्ट्रोक खेळला असेल, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

SCROLL FOR NEXT