maharashtra politics  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Politics : घोटाळे करून पैसे कमावणार, त्यातून राजकारण करणार; मनसेचा शिंदे गटावर तिखट वार

Maharashtra Politics : मनसे नेते राजू पाटील यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कथित टेंडर घोटाळ्यावरून राजू पाटील यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे. यावेळी ठाकरे गटावरही टीका केली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वर्षाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे. यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चेवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. याबाबत मनसे नेते राजू पाटील यांनी फडणवीस यांचं कौतुक करत शिवसेना शिंदे गटाला निशाणा साधला.

मनसे नेते राजू पाटील म्हणाले की, ज्या प्रमाणात या लोकांमध्ये भ्रष्टाचार फोफावला होता. कुठेतरी फडणवीस त्याला आळा घालत आहेत. फडणवीस चांगलं काम करत आहेत. 40 टक्क्यांहून अधिक कामे दिली जाताहेत. त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. चांगल्या कामाचे स्वागत झालं पाहिजे. पैसे जनतेचा आहे. घोटाळा करून पैसे कमवणार त्यातून राजकारण करणार. अडीच वर्षात टेंडर घोटाळे झाले आहेत. त्याची चौकशी करायला पाच वर्षे देखील कमी पडतील, असा टोला मनसेचे राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला.

'हप्ते खाऊन तीन कोटींच्या गाड्या घेतल्या'

केडीएमसी हद्दीतील अमृत योजनेवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटासह ठाकरे गटाला लक्ष्य केलं. शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी अमृत योजनेचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असं सांगितलं. तर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी लोकांची दिशाभूल करू नका, तांत्रिक टेंडर अजून बाकी आहेत. ते पूर्ण होण्यासाठी सहा महिने लागतील, असा टोला आमदार मोरे यांना लगावला होता. यावरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे या दोघांना नाव न घेता लक्ष्य केलं.

राजू पाटील पुढे म्हणाले की, अमृत योजना माझ्या वेळेला सुरू झाली. ज्यांनी हप्ते खाऊन तीन-तीन कोटींच्या गाड्या घेतल्या. ते आता डेडलाईन देत आहेत. हे सर्व एका थाळीचे चट्टेपट्टे असून सर्वांना माहिती काम कुठे थांबलेलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Parth Pawar: पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Solapur News : सोलापूरमध्ये धक्कादायक घटना! विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT