Maharashtra Politics: मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक, नेमकं काय ठरलं?

Who will be the opposition leader: आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधीपक्षासाठी या तीन नेत्यांच्या नावावर चर्चा झाली.

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि ठाकरे गट या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा पराभव झाल्याने महायुतीने विधानसभेवर आपला झेंडा रोवला. काही दिवसांतच महायुतीने आपले सरकार स्थापन केले.

मात्र, विधानसभेत अद्याप विरोधी पक्षनेते नियुक्त झालेला नाही. तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये इच्छुकता आहे. याशिवाय, काही वृत्तांनुसार महाविकास आघाडीला आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा दावा करता येणार नाही, अशीही चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर, आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभा अध्यक्षांकडे अधिकृत दावा करण्याचा निर्णय झाला. तसेच विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांसाठी विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा करण्यात आली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तोच अंतिम राहील, असे स्पष्ट केले आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठीच्या पत्रावर सर्व आमदारांच्या सह्यांसाठी मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या तिघांपैकी कोणाची निवड होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com