Raj thackeray  saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: "मनसेचं हेच पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवणार"; नागपूरातून राज ठाकरेंचा विरोधकांना जाहीर इशारा

Raj Thackeray Nagpur Visit: आजचे राजकारण बघिल्यावर सगळ्या गोष्टी पटकन हव्या आहेत, मात्र त्यासाठी जीवाचे रान करावे लागते.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Raj Thackeray Nagpur Visit: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपूरातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील, हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा पार पडला तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली, त्यावेळी केलेल्या भाषणातून राज ठाकरेंनी पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना धारेवर धरलं.

राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या भाषणात म्हणाले, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र देण्यासाठी तीनशे माणसे मुंबईत बोलविण्यापेक्षा एक माणूस नागपूरात (Nagpur) आलेला बरा. मागच्यावेळी मी दौरा केला तेव्हा मनसेला नियुक्त्या करण्यासाठी माणसं मिळत नाही अशा बातम्या आल्या होत्या, त्यामुळं आज ही नियुक्तीपत्रे सर्वांसमोर वाटली, त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आजचा दिवस आहे असं राज ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

यावेळी त्यांनी पत्रकारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, "काही पत्रकार एखाद्या पक्षासाठी वाहलेले असतात. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल, तर त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच आहे. मात्र, नागपूरमधील काही पत्रकार मनसेला प्रोत्साहन देत आहेत" असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच प्रत्येक राजकीय पक्ष या फेजमधून गेला आहे. पूर्वी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आता भाजपचा आहे. "आता म्हणणार मनसेचं हे पोट्ट काय करणार? पण हेच पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरविणार" असा जाहीर इशारा राज ठाकरेंनी आपल्या विरोधकांना दिला आहे.

पुढे ते म्हणाले, पराभव कुणाचा झाला नाही. संघाच्या स्थापनेनंतर जनसंघ पक्ष काढला. 1952 साली जन्माला आलेला जनसंघ 1980 ला भारतीय जनता पक्ष झाला. 2014 मध्ये त्यांना बहुमत मिळालं आणि खऱ्या अर्थाने यश आलं. काँग्रेसचा संघर्ष सुद्धा कमी नाही. 1966 साली जन्माला घातलेली माझ्या काकांची शिवसेना खऱ्या अर्थाने 1995 साली सत्ता आली. आजचे राजकारण बघिल्यावर सगळ्या गोष्टी पटकन हव्या आहेत, मात्र त्यासाठी जीवाचे रान करावे लागते.

माझ्या आयुष्यात अनेक संकटे आली, खचलो नाही कधी, खचणारही नाही. ज्या घरात मी लहानाचे मोठे झालो त्या घरी अनेक लोकं यायचे, रडत यायचे. एकदा बाळासाहेबांना एकदा बाहेर जायचे होते. ड्रायव्हर आला नाही, मुंबईचे महापौर आले, पण त्यांच्या गाडीत ते बसले नाही, ते टॅक्सीत बसले, मागून लाल दिव्याची गाडी येत होती, कारण पावर त्या टॅक्सीत होती अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे म्हणाले, तुम्हीच सर्व पदं घ्या, मला काहीही नको, त्यासाठी मेहनत घ्या. सर्व इतिहास अपमानातून घडला आहे महात्मा गांधी यांचे उदाहरण आहे. लोकं अपमान करतील, शिव्या देतीय, कौतुकही करतील, मात्र जमिनीत आपले पाय घट्ट रोवून घेवा. तसेच कोणत्याही पदावर पोहोचल्यावर कार्यकर्त्यांना तुच्छ लेखू नका, असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे, येत्या काही दिवसांत नागपूरमध्ये कार्यकर्त्यांसाठी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबीरात सर्वांना पक्षाच्या कामाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

SCROLL FOR NEXT