Corona Latest Updates: कोरोनाचा नवा BF.7 या नव्या व्हेरिएंटने भारताची चिंता वाढवली आहे. याबाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. पीएम मोदींची ही बैठक सुमारे अडीच तास चालली. यात सर्वप्रथम, आरोग्य मंत्रालयामार्फत बैठकीत कोविडच्या सद्यस्थितीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. आरोग्य मंत्रालयाने पंतप्रधानांना BF.7 या नव्या व्हेरिएंटबाबत आणि नव्या रुग्णांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तज्ज्ञांनी कोविड-19 वर भारत आणि चीनसह इतर देशांच्या स्थितीतील फरक स्पष्ट केला. बैठकीत पंतप्रधानांनी कोरोनाची स्थिती आणि आरोग्य मंत्रालयाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (PM Modi Latest News)
यावेळी कोविडबाबत सतर्क राहण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. त्यांनी जीनोम सिक्वेन्सिंग आणि कोरोना चाचण्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. राज्यांना रुग्णालये तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मास्क घालण्यासह कोविडचे योग्य वर्तन पाळण्याचा (covid appropriate behaviour) सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी वृद्ध आणि आजारी लोकांसाठी सावधगिरी बाळगण्याचे तसेच त्यांच्या लसीकरणावर भर दिला आहे. सोबतच फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोरोना योद्ध्यांच्या निस्वार्थ सेवेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. (Corona Latest News)
पंतप्रधानांच्या या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा आणि अधिकारी उपस्थित होते. तसेच कॅबिनेट सचिव राजीव गौना, गृह सचिव अजय भल्ला, आरोग्य सचिव आणि अधिकारी, नीती आयोगाचे सीईओ आणि अधिकारी, पेट्रोकेमिकल सचिव, नागरी विमान वाहतूक सचिव उपस्थित होते. (Latest Marathi News)
याआधी बुधवारी म्हणजेच 20 डिसेंबरला, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी चीन-अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोविड-19 झपाट्याने वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली होती. यानंतर, त्यांनी लोकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे आणि लसीकरण सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. मांडविया यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहून देखरेख यंत्रणा मजबूत करण्याचे निर्देशही दिले होते.
दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की एप्रिलपासून कोविड नॅशनल टास्क फोर्सची एकही बैठक झालेली नाही. यातील अनेक सदस्य निवृत्त झाले आहेत. 2020 मध्ये, टास्क फोर्सची 108 वेळा बैठक झाली होती. 2021 मध्ये 44 वेळा आणि या वर्षी 7 वेळा बैठक झाली. मात्र गेल्या ७ महिन्यांपासून टास्क फोर्सची एकही बैठक झालेली नाही. मार्च 2020 मध्ये या कोविड टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. 24 सदस्यांच्या या टास्क फोर्समधील एक चतुर्थांश सदस्य एकतर निवृत्त झाले आहेत किंवा आता त्या पदावर नाहीत. ICMRचे प्रमुख बलराम भार्गव आता त्या पदावर नाहीत.
दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. IMAने लोकांसाठी सूचनाही जारी केल्या आहेत.
IMAने जारी केलेले निर्देश
सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरावा.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.
नियमितपणे साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात धुणे.
विवाह, राजकीय किंवा सामाजिक सभा इत्यादी सार्वजनिक मेळावे टाळावेत.
आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.
ताप, घसादुखी, खोकला, लूज मोशन इत्यादी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शक्य तितक्या लवकर तुमचे कोविड लसीकरण करा.
वेळोवेळी जारी केलेल्या सरकारी सल्ल्यांचं पालन करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.