रणजीत माजगावकर, कोल्हापूर
Kolhapur Latest News: कोल्हापूरातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात उद्या, २३ डिसेंबर २०२२ पासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या BF.7 व्हेरिएंटमुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. याबाबत भाविकांना मात्र अद्यापतरी सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, मंदिरातील पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना उद्यापासून आता मंदिरात मास्क वापरावे लागणार आहे. (corona latest update)
यासोबतच मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी प्रशासनही सतर्क झालं आहे. मुंबादेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी मास्क लावावा असं आवाहन मुंबादेवी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दर्शनाला येताना मास्क लावणे सक्तीचे नाही, परंतु कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत असल्याने येणाऱ्या भक्तांनी काळजी घ्यावी यासाठी हे आवाहन करण्यात आलं आहे. (corona latest variant)
चीनसह जगभरात कोरोना (Omicron) रुग्णसंख्या अचानक वाढक आहे, त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. चीनमध्ये नव्यानेच आढळून आलेला BF.7 या व्हेरिएंटने हेदौस माजवला आहे. या व्हायरची भारतात देखील एंट्री झाली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 चे चार रुग्ण आढळले आहेत. गुजरात आणि ओडिशात या व्हेरिएंटचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारल अलर्ट झालं आहे. (Latest Marathi News)
जेव्हा विषाणू उत्परिवर्तित होतात तेव्हा ते त्यांचे स्वतःचे प्रकार आणि उप-रूपे तयार करतात. सार्स-कोव्ह-२ हा विषाणूचा मुख्य ताण असून वेगवेगळ्या प्रकारांच्या आणि उपप्रकारांच्या शाखा आहेत. बीएफ.७ देखील बीए.५.२.१.७ च्या समतुल्य आहे, जे ओमिकॉनचे उप-प्रकार आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला सेल होस्ट अँड मायक्रोब जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार बीएफ.७ उप-व्हेरियंटमध्ये मूळ डी ६१४ जी व्हेरिएंटपेक्षा ४.४ पट जास्त न्यूट्रलायझेशन रेझिस्टन्स आहे. याचा अर्थ असा की २०२० मध्ये जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसपेक्षा लसीकरण झालेल्या लोकांच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीज बीएफ.७ नष्ट करण्यास खूपच कमी सक्षम आहेत.
या व्हेरियंटची लक्षणे ओमिक्रॉनच्या दुसऱ्या सबव्हेरिएंटसारखीच आहेत. यामुळे संक्रमित व्यक्तीमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, थकवा, उलट्या आणि अतिसाराची लक्षणे उद्भवू शकतात.
या सब-व्हेरियंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झालेल्या लोकांना गंभीर आजार होऊ शकतो. बीएफ.७ उप-व्हेरियंट त्याच्या वर्गात आतापर्यंत ज्ञात असलेल्या इतर सर्वांमध्ये सर्वात संसर्गजन्य आहे. असा विश्वास आहे की हा व्हेरिएंट खूप वेगाने पसरत आहे आणि व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांनाही संक्रमित करू शकतो.
बीएफ.७ उप-व्हेरियंट म्हणजेच आरचा पुनरुत्पादन क्रमांक १० ते १८.६ असल्याचा शास्त्रज्ञांना संशय आहे. याचा अर्थ असा की बीएफ.७ संक्रमित व्यक्ती १० ते १८.६ लोकांना संक्रमित करू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.