MLA Mukta Tilak: भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

BJP MLA Mukta Tilak Passed Away: भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केलं. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन मतदान केलं.
BJP MLA Mukta Tilak Passed Away
BJP MLA Mukta Tilak Passed AwaySaam TV
Published On

BJP MLA Mukta Tilak: पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी आज, २२ डिसेंबर २०२२ ला दुपारी ३ः३० वाजता अखेरचा श्वास घेतला.

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (BJP MLA Mukta Tilak Passed Away)

BJP MLA Mukta Tilak Passed Away
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार जंयत पाटील निलंबित; हिवाळी अधिवेशन तापलं

भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केलं. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन मतदान केलं. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी करत आहेत. (Latest Marathi News)

जेव्हा मतदानासाठी मुक्ता टिळक स्ट्रेचरवरून आल्या होत्या.

१० जून २०२२ ला राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) सहा जागांसाठी मतदान झाले होत. अशावेळी रुग्णालयात दाखल असतानाही आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि आमदार लक्ष्मण जगताप हे (Laxman Jagtap) भाजपचे दोन्ही आमदार मतदानासाठी मुंबईत पोहोचले होते. मुक्ता टिळक या स्ट्रेचरवरून विधानभवनात मतदानासाठी आल्या होत्या तर जगताप हे अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात आले होते. त्यामुळे अशा कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी करत आहेत.

कोण होत्या मुक्ता टिळक?

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले. त्या भाजपच्या पहिल्या महिला महापौर असल्याचीही माहिती आहे. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत. अर्थात बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत.

शिक्षण

पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकलीय. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवलीय. शिवाय, मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतलंय. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केलं आहे.

मुक्ता टिळक यांची राजकीय कारकीर्द

आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर 2017 साली त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. त्या महापौर असतानाच 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या. मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत. मुक्ता टिळक या गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जायच्या. आता त्या गिरीश बापट यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जात असे.

BJP MLA Mukta Tilak Passed Away
Covid Variant BF.7: भारतात पुन्हा लॉकडाऊनची गरज पडेल का? डॉ. रवी गोडसेंना कसली भीती, पाहा Exclusive मुलाखत
लढवय्या आमदारांना भाजपचा विजय समर्पित: देवेंद्र फडणवीस

१० जून २०२२ ला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान झाले होत. अशावेळी रुग्णालयात दाखल असतानाही आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपचे दोन्ही आमदार मतदानासाठी मुंबईत पोहोचले होते. या निवडणूकीत भाजपने तीन जागा जिंकल्या होत्या. राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले होते. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले होते. त्यामुळे भाजपचे हे यश, आमदार जगताप तसेच मुक्ता टिळक यांच्या लढवय्येपणाचे आहे. हा विजय त्यांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com