Covid-19: ओमिक्रॉनच्या BF.7 व्हेरिएंटबाबत महाराष्ट्र सरकारची काय तयारी? आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

Maharashtra Health Minister Tanaji Sawant About Corona BF.7 Variant: महाराष्ट्रात BF.7 या नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही, तरिही आरोग्य खात्याची बैठक याबाबत बोलवून त्यांना सजग केलं असल्याचं सावंत म्हणाले.
Maharashtra Health Minister Tanaji Sawant
Maharashtra Health Minister Tanaji SawantSaam TV
Published On

सुशांत सावंत, मुंबई

Corona Latest Updates: कोरोनाचा नवा BF.7 या नव्या व्हेरिएंटने भारताची चिंता वाढवली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली होती. राज्यातही आज, कोरोनाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ओमिक्रॉनच्या BF.7 या नव्या व्हेरिएंटबाबत राज्य सरकारची काय तयारी सुरु आहे याबाबत माहिती दिली आहे. (Corona Latest News)

आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले की, परदेशात कोरोनाचा हाहाकार पाहता ही बैठक होती. बीएफ ७ हा नवीन व्हेरिएंट आला आहे. भारतात त्याचे ४ रुग्ण असले तरी महाराष्ट्रात BF.7 या नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही, तरिही आरोग्य खात्याची बैठक याबाबत बोलवून त्यांना सजग केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण काळजी घेणं गरजेचं आहे असं सावंत म्हणाले आहेत. (Covid In Maharashtra)

Maharashtra Health Minister Tanaji Sawant
Covid Variant BF.7: भारतात पुन्हा लॉकडाऊनची गरज पडेल का? डॉ. रवी गोडसेंना कसली भीती, पाहा Exclusive मुलाखत

पुढे ते म्हणाले, वृद्धांनी मास्क लावावेत, गर्दी करू नये, केंद्रानेही काही गाईडलाईन दिले आहेत. हा नवीन व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात फोफावतो. सध्या मास्कची सक्ती नाही, मात्र आजारी असलेल्या व्यक्तींनी मास्क लावावेत असं आवाहन यावेळी तानाजी सावंत यांनी केलं. सोबतच प्रयोग शाळेत आरटीपीसीआर वाढवावे आणि लसीकरणावर भर असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  (Latest Marathi News)

कोरोनाशी लढण्यासाठी राज्याची तयारी किती? याबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, आपल्याकडे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. रुग्णालयीन व्यवस्था नीट ठेवावी त्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

- महाराष्ट्रात फक्त १३२ रुग्ण आहेत.

- वेन्टिलेटर आणि ऑक्सिजन बेड तयार ठेवलेले आहेत.

- कोविड प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिलेले आहे.

- चार परदेशातून येणाऱ्या नागरिकाची थर्मल टेस्ट केली जाणार.

- नवीन टार्स फोर्स नेमण्यात आलेली आहे, ती डॉ. ओक यांच्या नेतृत्वाखाली नेमणार आहे.

- रॅली आणि मोर्चावर अद्यापतरी बंदी नाही.

- इतकही घाबरण्याचं कारणं नाही पण आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत.

- चीन, सिंगापूर, मलेशिया, कॅनडा, डेन्मार्क या देशातून येणाऱ्यांची थर्मल टेस्ट होणार.

Maharashtra Health Minister Tanaji Sawant
Covid-19 High level Meeting: कोरोना, मास्क अन् नियम...PM मोदींनी काय काय सांगितलं?

दरम्यान याबाबच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज उच्चस्तरीय बैठक घेतली. पीएम मोदींची ही बैठक सुमारे अडीच तास चालली. यात सर्वप्रथम, आरोग्य मंत्रालयामार्फत बैठकीत कोविडच्या सद्यस्थितीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. आरोग्य मंत्रालयाने पंतप्रधानांना BF.7 या नव्या व्हेरिएंटबाबत आणि नव्या रुग्णांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तज्ज्ञांनी कोविड-19 वर भारत आणि चीनसह इतर देशांच्या स्थितीतील फरक स्पष्ट केला.

यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. IMAने लोकांसाठी सूचनाही जारी केल्या आहेत.

IMAने जारी केलेले निर्देश

  1. सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरावा.

  2. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.

  3. नियमितपणे साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात धुणे.

  4. विवाह, राजकीय किंवा सामाजिक सभा इत्यादी सार्वजनिक मेळावे टाळावेत.

  5. आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.

  6. ताप, घसादुखी, खोकला, लूज मोशन इत्यादी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  7. शक्य तितक्या लवकर तुमचे कोविड लसीकरण करा.

  8. वेळोवेळी जारी केलेल्या सरकारी सल्ल्यांचं पालन करा.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com