mns saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

MNS News: विधानसभा निवडणुकीच्या निकालातील महायुतीला अभूतपुर्व यश मिळालं. तर मनसेची पुरती धुळधाण उडाली.

Saam Tv

भरत मोहळकर-

विधानसभा निवडणुकीच्या निकालातील महायुतीला अभूतपुर्व यश मिळालं. तर मनसेची पुरती धुळधाण उडाली. त्यानंतर राज ठाकरेंनी मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची माहिती समोर आलीय...मात्र या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

राज ठाकरेंच्या बैठकीपुर्वीच दहिसर विधानसभेचे मनसेचे उमेदवार राजेश येरुणकरांनी आपण राहतो तिथं आपल्याला फक्त 2 मतंच मिळाल्याच सांगत ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

एकीकडे मनसेने ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असतानाच आता एकूण झालेलं मतदान आणि ईव्हीएममधील मतमोजणीतील आकडे यातही मोठी तफावत आढळून आलीय. राज्यातल्या किती मतदारसंघात ही हा घोळ झालाय ते पाहूयात...

95 मतदारसंघात मतदान आणि मतमोजणीत तफावत.19 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानापेक्षा ईव्हीएममध्ये आढळली जास्त मतं.76 मतदारसंघात ईव्हीएमपेक्षा आढळली कमी मतं. बूथ पातळीवर तफावत असलेल्या मतदारसंघांची संख्या अधिक

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान विरोधक ईव्हीएमवर संशय व्यक्त करत भाजपवर हल्लाबोल करत होते. त्यावेळी राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला. मात्र आता ईव्हीएमचा फटका बसल्याचा दावा मनसेनं केल्याने राज ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

Sharad Pawar Speech : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, मातोश्रींना माहीतच नव्हतं; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

SCROLL FOR NEXT