MNS City Chief Beaten Over YouTube Interview Criticizing Minister Saam
महाराष्ट्र

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याविरोधात टीका करणं भोवलं, मनसे नेत्यावर हल्ला; नेमकं घडलं काय?

MNS City Chief Beaten Over YouTube Interview Criticizing Minister: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला गंभीर स्वरूपाची मारहाण. पंकज उमासरे याच्या चवदार तळे येथील दुकानात शिरून करण्यात आली मारहाण.

Bhagyashree Kamble

रायगड जिल्ह्यातील महाड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाड शहर प्रमुखांवर हल्ला करण्यात आला आहे. दुकानात शिरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात युट्युब चॅनलला मुलाखत दिली होती. याच मुलाखतीच्या रागातून मनसे नेत्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मनसेचे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे यांनी काही दिवसांपूर्वी एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्याविरोधात भाष्य केलं होतं. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी पंकज उमासरे यांच्यावर हल्ला केला.

उमासरे यांच्या चवदार तळे येथील दुकानात शिरून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत पंकज उमासरे यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी उमासरे यांच्यावर मुलाखतीच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार रूचक राजयोग; या राशींचं नशीब रातोरात पलटणार

Tata Sierra Booking Date: टाटाच्या नव्या SUV मॉडेलची किंमत आली समोर, बुकिंग डेट झाली फिक्स, वाचा फिचर्स

Castor Oil Benefits For Skin: सुंदर अन् मऊ त्वचेसाठी लावा एरंडेल तेल, आठवडाभरातच दिसेल मोठा फरक

Maharashtra Live News Update: धुळे शहरातील मोहाडी परिसरात 70 वर्षीय वृद्ध महिलेचा खून

"मी जिवंत आहे हो....!" सिद्ध करण्यासाठी वृद्धेची परवड; दहा लाख घेऊन मुलगा पसार

SCROLL FOR NEXT