Raj Thackeray Warrant News, Raj Thackeray latest Marathi News, MNS News Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरे यांच्या पायावर पुढच्या आठवड्यात होणार शस्त्रक्रिया

MNS Chief Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे

सुरज सावंत

मुंबई : मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा (Ayodhya Visit) तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. आज सकाळी राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राज यांचा पायाला (Leg Surgery) एक ते दीड वर्षापूर्वी दुखापत झाली होती. तेव्हापासून राज ठाकरे यांना हा त्रास जाणवत आहे. त्यामुळे पायाच्या दुखापतीमुळे राज ठाकरे यांनी हा दौरा तुर्तास स्थगित केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पायावर पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Bala Nandgaonkar) यांनी दिली आहे. (Raj Thackeray latest Marathi News)

बाळा नांदगावकर काय म्हणाले?

"राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर उलट सुलट चर्चा करण्याचं कारण नाही, येत्या 22 तारखेला ते पुण्यात सभा घेऊन याबाबत बोलणारच आहे. 22 तारखेला ते जेव्हा बोलतील, तेव्हा अयोध्या दौरा का? तुर्तास स्थगित करावा लागला याचे कारणं सुद्धा ते निश्चितपणे सांगतील. म्हणून त्यांनी जे ट्विट केलं आहे त्या ट्विटमध्ये स्पष्ट लिहलं आहे की, आपण 22 तारखेला बोलूच, त्यामुळे 22 तारखेला तुम्ही आणि आम्ही उत्सुक आहे की, ते नेमकं काय सांगणार आहेत". असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे बोलतांना बाळा नांदगावकर म्हणाले की, "आम्ही धरूनच चाललो आहे की, दौरा स्थगित आहे. आता दौऱ्याला निघालो तर विरोध बोलणार, नाही गेलो तरी बोलणार, स्थगित केला तरी बोलणार, मात्र आम्ही 22 तारखेला बोलणारच" अयोध्येत सुरक्षा पुरविण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना चिमटाही काढला आहे. "आम्ही अयोध्येत जेव्हा जाऊ तेव्हा संजय राऊत यांना सोबत घेऊन जाऊ, ते सोबत आले तर आम्हाला सुरक्षा मिळेल" आता तेव्हढंच बाकी राहिलं आहे, तुमच्याकडून सुरक्षा घ्यायची असा टोलाही बाळा नांदगावकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, एक ते दीड वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून राज यांना हा त्रास जाणवत आहे. मध्यंतरी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर गेले होते. तेव्हा देखील पायाच्या दुखण्यामुळेच त्यांना दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले होते. या दुखापतीसंदर्भात मध्यंतरी त्यांनी उपचारही घेतले होते. परंतु, आता या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे त्यांना अयोध्या दौरा स्थगित करावा लागला आहे. आता राज ठाकरे यांच्या पायावर पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Second Hand Iphone : सेंकड हँड आयफोन घेताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Priyadarshini Indalkar: 'अधुरी बातों की तरह...'; 'दशावतार' निमित्त प्रियदर्शनी इंदलकरचा दिलकश अंदाज

'कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा...'मनसेच्या ज्येष्ठ नेत्याकडून पक्षाला जय महाराष्ट्र, मनातील खदखद बोलून दाखवली

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

Samruddhi Kelkar: नथीचा नखरा! मराठमोळ्या समृद्ध केळकरचं सौंदर्य पाहताच खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT