Raj Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics Explainer: राज ठाकरे महायुतीत सामील होणार? राजकीय फायदा कुणाला होईल?

MNS News: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीची कारणे विविध असतील. मात्र दोन्ही नेत्यांमधील जवळीक आगामी शिवसेना-मनसे युतीची नांदी असल्याचे बोललं जात आहे.

प्रविण वाकचौरे

Raj Thackeray:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांआधी महायुतीत (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) सहभागी होतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे यांची भाजप आणि शिंदे गटासोबतच्या वाढत्या जवळीकीतून याबाबतचे संकेत मिळत आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंत तब्बल सहा भेटी झाल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीची कारणे विविध असतील. मात्र दोन्ही नेत्यांमधील जवळीक आगामी शिवसेना-मनसे युतीची नांदी असल्याचे बोललं जात आहे. काल (२८ डिसेंबर) देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या सरकारी निवासस्थानी भेट घेतली.

मुंबईतील विकासकामांबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मराठी पाट्या, टोल, धारावी पुनर्विकास प्रकल्प यांसह विविध विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राम मंदिराच्या विषयावरही दोघांमध्ये चर्चा झाली.

दोन्ही नेत्यांमधील समोर आलेली भेटीची कारणे जरी जनहिताची असली, तरी पडद्यामागे इतरही राजकीय चर्चा होत असाव्यात, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून बांधला जात आहे. राज ठाकरे जर सोबत आले तर, नक्कीच महायुतीची ताकद वाढेल आणि आम्ही त्यांचे स्वागत करू, असं शिंदे गटाचे नेते देखील म्हणत आहेत.

शिंदे गटाचे नेते काय म्हणाले?

राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. राज ठाकरे जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून एकत्रित येण्याचा निर्णय घेत असतील तर आम्ही स्वागतसाठी तयार आहोत, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे मास लीडर आहेत. त्यांनी एकत्रित यायला हवे. निवडणूक जिंकायची म्हणून सर्वांना सोबत घ्यायला हवे. राज ठाकरे युतीत लढले तर ताकत वाढेल, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं.

राजकीय गणिते

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करून आज १७ वर्षे उलटून गेली. मनसेने या दरम्यान लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्या. २००९ वगळता राज ठाकरे यांच्या पक्षाला फार यश मिळालं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना आपली राजकीय ताकद टिकवण्यासाठी आणि सत्तेसोबत जोडण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आगामी निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी झाली तर, भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल, असे मानले जात आहे.

दुसरीकडे महायुतीला देखील मनसेची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा निवडून आणण्याचं ध्येय महायुतीने ठेवलं आहे. महायुतीत भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांचा समावेश असला तरी ओपिनियन पोलमधून येणारी आकडेवारी महायुतीचं टेन्शन वाढवणारी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासारखा फायरब्रँड नेता सोबत आला तर महायुतीची ताकद निश्चितच वाढेल. याशिवाय राज ठाकरे सोबत आल्याने मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीलाच होईल. हे सर्व राजकीय कंगोरे पाहता राज ठाकरे महायुतीत सहभागी होतात की 'एकला चलो रे'च्या भूमिकेवर ठाम राहतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT