Raj Thackeray Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray News: "मला तडजोड करावी लागली तर मी..." राजकीय भूकंपावर राज ठाकरेंचे मोठे विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून ते दोन दिवसीय दापोली आणि चिपळून दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

अमोल कलये

Ratnagiri News: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही पक्षबांधणीसाठी बाहेर पडले आहेत.

आजपासून ते दोन दिवसीय दापोली आणि चिपळून दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये त्यांनी आगामी निवडणूकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सुचना दिल्या आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे?

चिपळूणमध्ये (Chiplun) झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आगामी निवडणूकांच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी "पक्ष सांगेल ते काम करावे लागेल अन्यथा पदावर राहता येणार नाही,.." असा सज्जड दमही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

लवकरच सभा घेणार...

राज्याच्या राजकीय वातावरणावर बोलण्यासाठी लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. "माझ्या मनातील संताप मला बाहेर काढायचा आहे, त्यासाठी येत्या 15 दिवसात मी मेळावा घेणार; ज्यामध्ये भूमिका स्पष्ट करु.." असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. (Maharashtra Politics)

लोकसभा निवडणूक का लढवायची...?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी "लोकसभेची निवडणूक का लढवायची ? असा सवालच पदाधिकाऱ्यांना विचारला. दारु, मटन पार्ट्यांसाठी निवडणूका लढवायची का.. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच शाखा नव्हे नाका उभा करा... जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवा;" असा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

Tanya Mittal: किती खोटं बोलशील...? तान्या मित्तल चुकीचे वय सांगून केला वाढदिवस साजरा; नेटकऱ्यांनी केली पोलखोल

Buldhana : खड्डा चुकवायला गेला अन् घात झाला, केळीचा ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Sunday lucky zodiac signs: आज होणार अनपेक्षित लाभ; रविवारी 'या' ४ राशींना मिळणार पैसा, शांतता आणि संधी

लाडक्या बहिणींनो E-KYC केलं की नाही? १५०० अडकतील, स्टेप बाय स्टेप घरीच करा E-KYC

SCROLL FOR NEXT